Sharad Pawar : पराभव दिसत असल्यामुळेच..; शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते तुळजापूरमध्ये बोलत होते.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं आहे. तर उर्वरीत टप्प्यांसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पराभवाची भीती वाटत असल्यामुळे मोदी राज्यात सभा घेत असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
पराभवाची भीती वाटत असल्यामुळे मोदी राज्यामध्ये सभा घेत आहेत. पराभव दिसत असल्यामुळे ते अशाप्रकारची वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काय केलं त्यांचा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे. त्यांच्याकडे मांडण्यासाठी काहीच नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. ते तुळजापूरमध्ये बोलत होते.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, धाराशिव व लातूर दोन्ही जिल्हे एकत्र होते. स्थानिक नेत्यांना आम्ही खूप प्राधान्य दिलं त्यातून लातूरचा विकास झाला, परंतू धाराशिव आहे त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे नेतृत्व चुकीच्या हातात दिल्याची खंत वाटते असं म्हणत त्यांनी यावेळी पाटील कुटुंबांवर देखील हल्लाबोल केला. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची चांगली परिस्थिती असून, मोठं यश महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
April 25, 2024 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Sharad Pawar : पराभव दिसत असल्यामुळेच..; शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल