Loksabha Election : नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची जाहीर सभेतून ऑफर, म्हणाले, महाविकास आघाडी..

Last Updated:

Loksabha Election : धाराशिव येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री निकीन गडकरी यांना खुली ऑफर दिली आहे.

नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची ऑफर
नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची ऑफर
धाराशिव : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षण निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. प्रचारात भाजपने नेहमीप्रमाणे आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीचा अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तोच भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज लोकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांकडून भाजपवर तोंडसुख घेतलं जात आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे. ठाकरे धाराशिव येथे बोलत होते.
ठाकरेंची गडकरींना ऑफर
उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण, भाजपचे नेते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
या परिवाराची जबाबदारी कोण घेणार?
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना माझं कुटुंबं माझी जबाबदारी अशी घोषणा दिली होती. आता यांनी मोदी का परीवार सुरू केलं आहे. तुमचं परीवार ठीक आहे, पण या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. मी मुख्यमंत्री नाही हे मला माहित आहे. पण काही गद्दार म्हणतात हे अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. ओमराजे आणि कैलास यांचे कौतुक. कारण त्यांना देखील लालच दाखविण्याचा प्रयत्न झाला होता, हे खरे शिवसैनिक आहेत. आमदार खासदार नेले म्हणजे शिवसेना संपणार नाही. शिवसेना भाजपला संपवून मुठमाती करेल.
advertisement
स्वतःच्या बापाचा फोटो वापरा : ठाकरे
अमित शहा मणिपूरला जात नाहीत तिकडे शेपुट घालतात आणि इथे मोठ बोलतात. भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा आणि भाजप पक्ष वाढावा हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो, स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून राजकरण करून दाखवा, आमच्या वडिलांचे फोटो का लावता? अशी टीका ठाकरेंनी केली. ठाकरे पुढे म्हणाले, की काँग्रेसने फक्त 600 कोटी जमवले सत्तेत असताना. पण भाजपने काही वर्षातच सात आठ हजार कोटी जमवले. मग लुटले कोणी? जाहिरातीसाठी 84 कोटी खर्च केले आणि काय बघायचे तर त्यांचे दाढीवाले फोटो? आम्ही कामे केली पण जाहिराती केल्या नाहीत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Loksabha Election : नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची जाहीर सभेतून ऑफर, म्हणाले, महाविकास आघाडी..
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement