Manoj Jarange Patil : ..तोपर्यंत आंदोलन नाही; आरक्षणाची डेडलाईन संपण्यापूर्वीच जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
उस्मानाबाद, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण दिलं, मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंतची डेडलाईन दिली आहे. जरांगे पाटील यांनी दिलेल्या डेडलाईनला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. दरम्यान डेडलाईन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असताना मोठी बातमी समोर आली आहे.
आषाढी वारी संपेपर्यंत मराठा समाज कुठलेच आंदोलन करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने दिलेले अल्टिमेटम संपताच बैठक घेऊन पुढची दिशा ठरवू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सरकारसोबत रोजच बोलणी होतात, मात्र आरक्षणाच्या विषयात महत्त्वाचं काहीच नाही. सरकारने आम्हाला दिलेलं 10 टक्के आरक्षण 27 टक्के ओबीसी आरक्षणात घेऊन ओबीसी आरक्षण वाढवावं, सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, हे आता आम्ही ओळखलं आहे. सगळे मंत्री व विरोधी आमदारांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अधिवेशनात विषय लाऊन धरावा, अन्यथा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिंदे समितीला पुरावे मिळाले ती चांगली गोष्ट आहे, याबाबत शंभूराजे देसाई व राज्य सरकारचे नेते सांगतील, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
July 11, 2024 12:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Manoj Jarange Patil : ..तोपर्यंत आंदोलन नाही; आरक्षणाची डेडलाईन संपण्यापूर्वीच जरांगे पाटलांचा मोठा निर्णय


