Dharashiv : खासदार ओमराजेंनी गप्प बसावं, जरांगेंनी झापलं; मराठा समाजही आक्रमक

Last Updated:

ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असुन केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी न्यूज 18 लोकमत ला बोलताना केली होती.

News18
News18
बालाजी निरफळ, धारशिव : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. ओमराजेंविरोधात रात्री आंदोलन करण्यात आले. त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनीही ओमराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून जर आमच्या मागण्या कळत नसतील तर खासदारांनी गप्प बसावं असं म्हटलंय.
धाराशीवमध्ये खासदार ओमराजें विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली होती. निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.  मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी आहे. मात्र ओमराजेंनी केंद्र सरकारनं ५० टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजेंच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
advertisement
ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असुन केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी न्यूज 18 लोकमत ला बोलताना केली होती. ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजे यांच्या फोटोला जोडे मारले. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे यांनी देखील काल याच मागणीवरन ओमराजे निंबाळकर यांना आमच्या मागणी कळत नसेल तर गप्प बसावं अशी टीका केली होती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv : खासदार ओमराजेंनी गप्प बसावं, जरांगेंनी झापलं; मराठा समाजही आक्रमक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement