Manoj Jarange Patil : ज्या नेत्याचा सर्वाधिक विरोध आता त्याच समाजासाठी जरांगे पाटील मैदानात; आमरण उपोषणापूर्वी मोठी घडामोड
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मनोज जरांगे पाटील 20 जुैलपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत, त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आपल्या या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी याच मुद्द्यावर पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला ओबीसी समाजामधून मोठा विरोध होत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याच मुद्द्यावर उपोषण सुरू केलं होतं, मात्र सरकाराच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मनोज जरांगे पाटील आता आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार आहेत, त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवांशी संवाद साधला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील धनगर समाजाच्या आंदोलक बांधवांशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, आंदोलकानी तब्येतीची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. प्रत्येक सरकारने आम्हाला फसविले त्यामुळे आम्ही शेवटचा लढा म्हणून आमरण उपोषणाला बसलो असल्याचे आंदोलकांनी जरांगे पाटील यांना यावेळी सांगितले. जरांगे यांच्याशी संवाद साधताना तरुण चांगलेच भावूक झाले होते, तब्येतीची काळजी घ्या असे ते एकमेकांना म्हणाले.
advertisement
धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे तीन तरुण गेल्या तीन दिवसापासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाचा आज 4 था दिवस आहे.दरम्यान तुमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी कोणी आले होते का ? असे जरांगे यांनी आंदोलकांना विचारले. त्यावर प्रशासन आल्याचे त्यांनी सांगितले, मात्र त्यांनी उद्रेक होईपर्यंत अंत पाहू नये असेही ते यावेळी म्हणाले.आंदोलकांनी जरांगे यांना धाराशिव येथील आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली त्यावर जरांगे पाटील यांनी सांगितले की मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. मी पुन्हा आमरण उपोषण सुरु करीत आहे, त्यामुळे मी नाही आलो तरी सोबत आहे, मी तुमचा विषय लावून धरेल असं अश्वासन या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
July 18, 2024 7:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Manoj Jarange Patil : ज्या नेत्याचा सर्वाधिक विरोध आता त्याच समाजासाठी जरांगे पाटील मैदानात; आमरण उपोषणापूर्वी मोठी घडामोड