Maratha Reservation : मराठा तरुणानं लोकसभेच्या उमेदवारीसाठी सोयाबीन ठेवलं तारण, स्वत:सह आई-वडील अन् पत्नीचा भरणार अर्ज

Last Updated:

धाराशिवच्या तरुणानं लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपलं सोयाबीन तारण ठेवलं आहे. तो आपला स्वत:चा तसेच आई वडील आणि पत्नीचा देखील अर्ज दाखल करणार आहे.

News18
News18
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : एकीकडे लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, तर दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तसेच सरकारने सगे -सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील त्यांची आहे. दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातून मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावेत असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या आवाहानाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या कारी गावातील तरुणानं आपलं सोयाबीन तारण ठेवून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.
हा तरुण आपल्यासोबतच आपले आई-वडील आणि पत्नी असे चार लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणार आहे. अमोल जाधव असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या मालकीचे साडेतीन टन सोयाबीन शासकीय गोदामात तारण ठेवलं आहे. त्याने सोयाबीन तारण ठेवून एक लाखाची उचल घेतली आहे, याच पैशांमधून तो आता आपले आई-वडील, पत्नी आणि स्वत: चा  उमेदवारी अर्ज भरणार आहे.
advertisement
कुटुंबातील एकूण चार सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं अमोल जाधव यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारने आतापर्यंत मराठा समाजाची फसवणूक केली आहे, आता या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करून, एक आगळे वेगळे आंदोलन करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातून 1000 मराठा आंदोलकांनी उमेदवार अर्ज भरण्याची तयारी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maratha Reservation : मराठा तरुणानं लोकसभेच्या उमेदवारीसाठी सोयाबीन ठेवलं तारण, स्वत:सह आई-वडील अन् पत्नीचा भरणार अर्ज
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement