वृद्ध आईसह मुलाने संपवलं जीवन, 15 दिवसांनी घटना उघडकीस; 9 वर्षांच्या चिमुकलीवर पडली कुटुंबाची जबाबदारी

Last Updated:

पत्नी अर्धांग वायूने आजारी तर वडील ही अंथरुणाला धरून असायचे. त्यातच कर्जबाजारीपणा वाढत चालल्याने वृद्ध आईसह मुलाने टोकाचं पाऊल उचललं.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
बालाजी निरफळ, धाराशिव, 27 डिसेंबर : वृद्ध आई आणि मुलाने कर्जबाजारीपणा, घरातल्या सदस्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धारशिव जिल्ह्यातील येडशी गावात घडली आहे. दोघे मायलेक दवाखान्यात जातो असं सांगून घरातून निघून गेले होते. १५ दिवसांनी त्या दोघांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं असून कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबाची जबाबदारी अवघ्या ९ वर्षांच्या चिमुकलीच्या खांद्यावर पडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरातील कमावत्या व्यक्तींनीच आत्महत्या केल्याने कुटुंबाची जबाबदारी अवघ्या नऊ वर्षाच्या ईश्वरीवर येऊन पडली आहे. वृद्ध आजोबा व दोन छोट्या भावंडांचा सांभाळ करण्याची वेळ ईश्वरी वर आलीय. सागर सुतार यांच्या कुटुंबात पत्नी अर्धांग वायूने आजारी तर वडील ही अंथरुणाला धरून असायचे. त्यातच कर्जबाजारीपणा वाढत चालल्याने सागर सुतार व आई सुमन सुतार हे मायलेक दवाखान्यात जातो म्हणून गेले. त्यानंतर तुळजापुरात जाऊन त्यांनी आत्महत्या केली.
advertisement
पंधरा दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सुतार कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. अर्धांगवायूने आजारी असलेल्या आईसह घराची जबाबदारी नऊ वर्षाच्या ईश्वरीवर येऊन पडलीय. मायलेकांच्या आत्महत्येनंतर आता घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील काही लोकांनी कुटुंबांनी मदत करत तातडीची जगण्याची गरज भागवली. मात्र भविष्यात संकटाचा सामना ९ वर्षाच्या मुलीला करायचा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
वृद्ध आईसह मुलाने संपवलं जीवन, 15 दिवसांनी घटना उघडकीस; 9 वर्षांच्या चिमुकलीवर पडली कुटुंबाची जबाबदारी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement