दहा दिवसांपूर्वी लग्न, किल्ल्यावर फिरायला गेलेल्या नववधूला फोटो काढणं बेतलं जीवावर, तरुणीचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
धाराशिवमधल्या नळदुर्ग किल्ल्यात बुरुजावर उभा राहून सेल्फी काढताना तोल गेल्यानं नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अवघ्या १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे.
बालाजी निरफळ, धाराशिव : धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना सुटत नाही. मात्र अशा सेल्फीमुळे आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत याची कल्पना फोटो काढताना येत नाही. अनेकदा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता धाराशिवमधल्या नळदुर्ग किल्ल्यात बुरुजावर उभा राहून सेल्फी काढताना तोल गेल्यानं नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अवघ्या १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातली हरगंगा गावची तरुणी नळदुर्ग किल्ल्यावर फिरायला आली होती. दहा दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर फिरायला ती किल्ल्यावर आली होती. तेव्हा नळदुर्ग किल्ल्यातल्या उपळाई बुरुजावर ती सेल्फी घेत होती. तेव्हा तोल जाऊन ती खाली पडली.
तरुणी बुरुजावरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी सोलापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. निलोफर अमीर शेख असं २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे. दहा दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2024 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
दहा दिवसांपूर्वी लग्न, किल्ल्यावर फिरायला गेलेल्या नववधूला फोटो काढणं बेतलं जीवावर, तरुणीचा मृत्यू