Uddhav Thackeray : 'आपल्यासोबत दगा झाला, त्याचवेळी...' अन् भरसभेत उद्धव ठाकरेंनी घेतली तुळजा भवानीची शपथ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये सभा झाली. या सभेमधून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
धाराशिव, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये सभा झाली. या सभेमधून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. समाजातील प्रश्नांबद्दल भाजपचे मंत्री मोदींसमोर कधी बोलले? केंद्रीय गृहमंत्र्यांना धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचं नामांतर कोणी केलं हे माहित नाही, मग दहा वर्ष सत्तेत सोबत होतात, तेव्हाच का केलं नाही नामांतर असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समाजातील प्रश्नांबद्दल भाजपचे मंत्री मोदींसमोर कधी बोलले, केंद्रीय गृहमंत्र्यांना धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचं नामांतर कोणी केलं हे माहित नाही, मग दहा वर्ष सत्तेत सोबत होतात, तेव्हाच का केलं नाही नामांतर असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपनं आपल्या पाठीत वार केला, अमित शाह यांनी मला बंद खोलीत शब्द देऊन दगा केला, तुळजा भवानीची शपथ घेतो मला शाहांनी शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान 2019 ला निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी मातोश्रीवर का आले होते? शाह मोंदीच्या प्रचारासाठी आम्हाला का बोलावण्यात आलं? शिवसेनेने भाजपाला नेहमीच खांद्यावर घेतलं, खाद्यांवर घेतलं नसतं तर चार खांदे मिळाले असते अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
महिला दिनाच्या शुभेच्छा कोणत्या तोंडानं द्यायच्या? मणिपूरमधील महिलांवर कोणी बोलत नाही. महिलांनी आता कालीमातेचं रूप घ्याव, दिल्लीमध्ये आपली सत्ता येणारच ती आम्ही आणणारच असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
March 08, 2024 2:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Uddhav Thackeray : 'आपल्यासोबत दगा झाला, त्याचवेळी...' अन् भरसभेत उद्धव ठाकरेंनी घेतली तुळजा भवानीची शपथ