Dhule Lok Sabha Result 2024 : 15 वर्षांनंतर धुळे भाजपच्या हातातून जाणार? धक्कादायक आकडेवारी समोर

Last Updated:

धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव 7 हजार 184 मतांनी पुढे असल्याचं समोर आलं आहे

सुभाष भामरे आणि शोभा बच्छाव
सुभाष भामरे आणि शोभा बच्छाव
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव 7 हजार 184 मतांनी पुढे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे, डॉ. भामरे यांना मोठा झटका बसला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस तुल्यबळ लढत देत असल्यामुळे भाजपाला लीड मिळत नसल्याची स्थिती आहे. मालेगावमध्येही काँग्रेसला एकतर्फी मतदान झाल्याचं समोर देत आहे. भाजपचं 2009 पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे सलग दोन वेळा इथून निवडून आले आहेत. पक्ष नेतृत्वाने यावेळी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. आता तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता धुळ्यातील सुरुवातीचा कल समोर .येत आहे.
advertisement
धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा 60.61 टक्के मतदान झालं होतं. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असलं तरी सध्याचं चित्र काहीसं वेगळं होतं. सध्या कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन शेतकरी वर्गाची केंद्र सरकारवर नाराजी दिसून आली. मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला होता. तसंच धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात पाटचाऱ्या, कालव्यांचे प्रश्न कायम होता. त्यामुळे, मतदारराजा कोणाचं पारडं जड करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule Lok Sabha Result 2024 : 15 वर्षांनंतर धुळे भाजपच्या हातातून जाणार? धक्कादायक आकडेवारी समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement