Lok Sabha Election Result 2024 : आघाडीत मोठा उलटफेर! NDA च्या जागा घटल्या; INDIA 200 पार

Last Updated:

आतापर्यंत 508 जागांचे कल आले आहेत. एनडीए 295 सीटवर आघाडीवर आहेत. तर इंडिया 190 सीटवर आघाडी घेत जोरदार टक्कर देताना दिसत आहे. 

लोकसभा निवडणूक निकाल
लोकसभा निवडणूक निकाल
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालाच्या आघाडीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होतो आहे. आतापर्यंत 508 जागांचे कल आले आहेत. एनडीए 295 सीटवर आघाडीवर आहेत. तर इंडिया 190 सीटवर आघाडी घेत जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
अब की बार 400 चा नारा देणाऱ्या भाजपाला 300 जागांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. एकेकाळी आघाडीत एनडीएने 300 पार केले होते. पण आता ते 300 जागांच्या खाली आहे.
जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला आहे.  विशेष म्हणजे, भाजपने यावेळी 'अब की बार 400 पार'चा नारा दिला आहे. पण एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350 ते 380 पर्यंत जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहण्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेस यावेळी मोदींचा रथ रोखणार का, लोक इंडिया आघाडीला स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
महाराष्ट्रात कोण उधळणार विजयाचा गुलाल?
निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातील निकालांवर. राज्यात महायुती की मविआ कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीनं आपण राज्यात 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय. तर मविआ नेतेही आपण 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करत आहेत. राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. बारामती, माढा, शिरूर, बीड, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सांगली या मतदारसंघामध्ये कांटे की टक्कर झाली. अनेक मतदारसंघामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला याचा अंदाज छातीठोकपणे कुणालाही वर्तवता येत नाही. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर या मतदानात दिसणार का याची चर्चा आहे. तर राज्यात वंचितचा फटका कुणाला बसणार याची उत्सुकताही आहे.
मराठी बातम्या/देश/
Lok Sabha Election Result 2024 : आघाडीत मोठा उलटफेर! NDA च्या जागा घटल्या; INDIA 200 पार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement