Dhule News : उतारावर ट्रॅक्टर लावला, दोन मुली खेळता खेळता आक्रित घडलं, कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश

Last Updated:

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतात ट्रॅक्टरवर दोन मुली खेळत होत्या. खेळता खेळता अचानक ट्रॅक्टरने वेग पकडला आणि दोन मुलींसह थेट 60 फुट खोल विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे.

dhule news
dhule news
Dhule News : दीपक बोरसे, प्रतिनिधी, धुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतात लावलेला ट्रॅक्टर दोन मुलींसह थेट विहिरीत कोसळल्याची घटना घडली होती.खरं तर या मुली ट्रॅक्टवर खेळत होत्या आणि अचानक तो थेट 60 फुट खोल विहिरीत कोसळल्याची घटना घडली होती. गणेशपुर गावात ही दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर तत्काळ दोन मुलींचा शोध सूरू करण्यात आला आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गणेशपूर गावात ही दुदैवी घटना घडली आहे. गणेशपुरी गावात एक कुटुंबिय आपल्या शेतातील कांदा भरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. या ट्रॅक्टरमध्ये कांदाही भरण्यात आला होता. आणि या ट्रॅक्टरवर दोन मुली खेळत होत्या. या दोन मुली खेळत असताना अचानक ट्रॅक्टरने वेग पकडला आणि तो थेट विहिरीत जाऊन कोसळला होता. ही विहीर साधारण 60 फुट खोल होती. त्यामुळे या दोन मुलींना वाचवायला जाईपर्यंत ट्रॅक्टर थेट आत शिरला होता.
advertisement
ही घटना पाहताच शेतकऱ्यांनी धाव घेतली पण त्याच्या हाती काहीच लागले नव्हते.पण यानंतर या घटनेची साक्रि पोलिसांना माहिती देण्यात आली होती आणि तत्काळ बचाव मोहिमेला सूरूवात करण्यात आली आहे. तसेच विहिरीतले पाणी काढण्यासाठी पाईप लावण्यात आले आहेत आणि मुलींचा युद्धपातळीवर शोध सूरू आहे.
advertisement
खरं तर ट्रॅक्टर हा उतारावर लावण्यात आला होता,त्यामुळे अचानक त्याने वेग पकडला आणि तो विहिरीत जाऊन कोसळला होता.आता या घटनेनंतर मुलींचा युद्धपातळीवर शोध सूरू आहे. या घटनेने मुलींच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule News : उतारावर ट्रॅक्टर लावला, दोन मुली खेळता खेळता आक्रित घडलं, कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement