'पोरगी पटवायची असेल तर..'; भाजप मंत्र्याचं अधिकाऱ्यांसमोरच वादग्रस्त वक्तव्य!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गावीत चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी धुळ्यात बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
धुळे, 21 ऑगस्ट, दिपक बोरसे : भाजप नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेमध्ये आले आहेत. दररोज मासे खा, मासे खाल्ल्यामुळे तुमचे डोळे सुंदर होतील. मग तुम्हाला ज्या मुलीला पटवायचे आहे, ती मुलगी तुम्हाला पटेल असं वक्तव्य गावीत यांनी केलं आहे. ते धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीच्या साहित्याचं वाटप कार्यक्रमात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले गावीत?
विजयकुमार गावीत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. 'दररोज मासे खात जा. मासे खाल्ल्यामुळे तुमचे डोळे सुंदर होतील. मग तुम्हाला ज्या मुलीला पटवायचं आहे, ती मुलगी तुम्हाला पटेल असं गावीत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. ऐश्वर्या रॉय ही बंगळुरूजवळील समुद्र किनारी असलेल्या शहरात राहायची. ती दररोज मासे खात होती. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे ऐश्वर्या रॉयप्रमाणे सुंदर होतील. त्वचा देखील सुधारेल'. असं वक्तव्य गावीत यांनी केलं आहे.
advertisement
दरम्यान गावीत हे आपल्या या वक्तव्यामुळे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. ते धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीच्या साहित्याचं वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हिना गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. गावीत यांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
Location :
Dhule,Dhule,Maharashtra
First Published :
August 21, 2023 10:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
'पोरगी पटवायची असेल तर..'; भाजप मंत्र्याचं अधिकाऱ्यांसमोरच वादग्रस्त वक्तव्य!