गणपती विसर्जनादरम्यान मद्यधुंद चालकाने अचानक ट्रॅक्टर सुरू केला, तीन चिमुकल्यांचा चिरडून मृत्यू

Last Updated:

Dhule Accident: गणपती विसर्जन मिरवणुकीचा सगळीकडे उत्साह असताना धुळ्यातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा दारू प्यायलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

धुळे अपघात
धुळे अपघात
धुळे : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना धुळ्यात विसर्जन मिरवणुकीवर दु:खाचे सावट आहे. चित्तोडगावातील विसर्जन मिरवणुकीत दारू प्यायलेल्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीने तिघा मुलांना चाकाखाली चिरडले. घटनेत तीन चिमुरड्यांचा जागेवरच करुण अंत झाला तर सहा जण जखमी झाले आहेत.
धुळे शहराला लागून असलेल्या चित्तोड गावात एकलव्य मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी थांबून कार्यकर्ते नाचत होते. मद्यधुंद चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केल्याने ट्रॅक्टर खाली येऊन तीन लहान बालकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी आहेत. जखमींना तातडीने शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीचा सगळीकडे उत्साह असताना धुळ्यातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा दारू प्यायलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घडलेल्या घटनेचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.
advertisement
मृतांमध्ये परी शांताराम बागुल (वय १३), शेरा बापू सोनवणे (वय ६) लड्डू पावरा (वय ३) या बालकांचा समावेश आहे. घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. दुसरीकडे घटनेत गंभीर जखमी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हिरे रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
गणपती विसर्जनादरम्यान मद्यधुंद चालकाने अचानक ट्रॅक्टर सुरू केला, तीन चिमुकल्यांचा चिरडून मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement