Gram Panchayat Election : धुळ्यात शिंदे गटासह ठाकरेंना भोपळा, भाजप आणि अजितदादांनी मैदान मारलं!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं सात ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट दोन ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाला आहे.
धुळे, 6 नोव्हेंबर, दिपक बोरसे : रविवारी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मतदान झालं. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता ग्रामपंचायत निकालांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं सात ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट दोन ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेसला अद्याप भोपळाही फोडता आलेला नाही. शिंदखेडा तालुक्यात पहिल्या फेरीतील 6 पैकी 5 ग्रामपंचायतीवर भाजपनं विजय मिळवला आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पनाला
दरम्यान आज राज्यभरात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याचवेळत निकाल हाती येणार आहेत. आगामी काळात विधानसभा आणि लोकसभेची देखील निवडणूक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जनतेचा कौल जाणून घेण्याची ही एक संधी आहे. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Location :
Dhule,Dhule,Maharashtra
First Published :
November 06, 2023 12:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
Gram Panchayat Election : धुळ्यात शिंदे गटासह ठाकरेंना भोपळा, भाजप आणि अजितदादांनी मैदान मारलं!


