Dhule News: धुळ्यात हिट अँड रनचा थरार! ट्रकने वाहनांना 1 किलोमीटर फरफटत नेलं, पत्रकाराचा जागीच मृत्यू
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Dhule News: धुळ्यात एका भीषण अपघातात एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे.
धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे शहरात अशीच एक हादरवणारा अपघात घडला आहे. येथे एका भरधाव ट्रकने वाहनांना जोरदार धडक दिली. ज्यात एकाचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भरधाव ट्रकने वाहनास जवळपास अर्धा ते एक किलोमीटर फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. ट्रकचालकाने परिसरातील नागरिक पाठीमागे लागल्याने आणखी दोघांना उडवलं, असं सांगण्यात येत आहे. या अपघातात पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार
धुळे जिल्ह्यातील धुळे औरंगाबाद महामार्गावरील गरताड गावाजवळ भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने धुळे औरंगाबाद रोडवरील गरताड जवळ चारचाकी गाडीला उडवले. भीषण अपघातात एकजण ठार दोन जण गंभीर जखमी झाले. भीषण अपघातात मुंबई येथील तरुण पत्रकार हर्षल भदाणे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातानंतर भरधाव ट्रक धुळे शहरात शिरला. शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आणखी चार वाहनांना ट्रकने धडक दिली. त्यानंतर ट्रक सोडून वाहन चालक फरार झाला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
July 29, 2024 11:31 PM IST
मराठी बातम्या/धुळे/
Dhule News: धुळ्यात हिट अँड रनचा थरार! ट्रकने वाहनांना 1 किलोमीटर फरफटत नेलं, पत्रकाराचा जागीच मृत्यू