Ajit Pawar : 'रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी पण...' जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी, म्हणाले..

Last Updated:

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सध्या गुलाबी जॅकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. यावरुन शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजितदादांना कोपरखळी मारली.

जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी
जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी
धुळे, (दिपक बोरसे, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाल्याची पाहायला मिळाली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. यात प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या योजना सर्वदूर पोहण्यासाठी अजितदादांनी आपलं रंगरूप बदललं आहे. यातूनच त्यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा होत आहे. इतकंच नाही तर प्लेक्सही आता गुलाबी रंगात दिसू लागले आहेत. यावरुन आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजितदादांना कोपरखळी मारली आहे.
जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी
रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी फुल मात्र पांढरं असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना कोपरखळी मारली आहे. सध्या राज्यात सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत, रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही, कुठला रंग वापरावा हे ज्याचं त्याचं चॉईस आहे. पण फुल मात्र पांढरे वापरले असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंक जॅकेटवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.
advertisement
आमच्या काळातही या योजना सुरू ठेऊ पण.. : जयंत पाटील
भाजप विविध योजनांची घोषणा सध्या करत आहे. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत आपला पराभव अटळ आहे, हे लक्षात आल्याने भाजपाला या गोष्टी आठवल्या अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. बहिण भावा नंतर आता आजोबा पुतणे चुलते हे देखील येणाऱ्या काळात लाडके होण्याची शक्यता आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी लाडका भाऊ व लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. तिजोरीत काही असो की नसो विविध योजनांची घोषणा करण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. आमचं सरकार पडलं तर या योजना बंद होतील असं सांगणं चुकीचं आहे. या योजनांमधील त्रुटी दूर करून अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही आमचं सरकार आल्यानंतर या योजना राबवू व लाडक्या बहिणींची सेवा आम्हीही करू, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/धुळे/
Ajit Pawar : 'रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी पण...' जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी, म्हणाले..
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement