Dhule News : राष्ट्रवादीचं कार्यालय कुणाचं? धुळ्यात राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलं टाळं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेतला होता. तर शरद पवार गटाने कार्यालय आमचं असल्याचं सांगत कार्यालयावर दावा केला.
दीपक बोरसे, धुळे, 09 ऑगस्ट : धुळ्यात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावरून वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेण्यावरून अजित पवार तसेच शरद पवार गट आमने-सामने आले आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेतला होता. तर शरद पवार गटाने कार्यालय आमचं असल्याचं सांगत कार्यालयावर दावा केला. यामुळे रात्री उशिरापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.
कार्यालय कोणाचे यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या वादात अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. धुळे जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाला शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आता टाळे ठोकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय कोणाचं? असा प्रश्न उपस्थित होतेय. दरम्यान, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर निर्णय घेणार असल्याची दोन्ही गटांची भूमिका आहे.
advertisement
अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांनंतर धुळ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय सोडल्याची माहिती कळताच अजित पवार गटाच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयावर दावा सांगितला आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे कुलूप तोडून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर ताबा घेतला होता.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या महिन्यात फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. तसंच अजित पवारांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये कार्यालय ताब्यात घेण्यावरून राडा झाला होता. परिसरामध्ये तणाव वाढल्यामुळे शेवटी पोलिसांना बोलावण्यात आलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2023 9:26 AM IST
मराठी बातम्या/धुळे/
Dhule News : राष्ट्रवादीचं कार्यालय कुणाचं? धुळ्यात राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलं टाळं