धुळ्यात चोरी करायला घरात शिरले चोर; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तरुणीलाही उचललं अन्..
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
धुळ्यातून चोरीचं एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चोरांनी चक्क एका तरुणीचंही अपहरण केलं.
धुळे 26 नोव्हेंबर : चोरीच्या घटना देशभरातून दररोज समोर येत असतात. कधी ही चोरी लहान गोष्टींची असते, कधी लाखो रुपयांची तर कधी हे चोर माणसांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहात नाहीत. मात्र, आता धुळ्यातून चोरीचं एक अतिशय अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चोरांनी चक्क एका तरुणीचंही अपहरण केलं.
दौलत नावाच्या बंगल्यावर या चोरांनी दरोडा टाकला. इथे दरोडा टाकत पाच ते सात दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांचं रोकडही लंपास केली. चोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी घरातील एका तरुणीलाही आपल्यासोबत उचलून नेलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तरुणीच्या अपहरणाचं गूढ अजूनही कायमच आहे.. दरोड्यासह अपहरण झाल्याची धुळे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अहमदनगरमध्येही विचित्र घटना -
नुकतीच अहमदनगरमधून अशीच एक विचित्र घटना समोर आली होती. यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप थेट विहीरीत कोसळला. अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप थेट 75 फुट खोल विहीरीत कोसळला. ड्रायवरसह पाचजण गाडीत होते. चौघांनी बाहेर पडत आपला जिव वाचवला. मात्र, ड्रायव्हर गाडीसह विहीरीत बुडाला. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत असताना हा अपघात झाल्याची माहीती असून गाडी बाहेर काढण्यात आली आहे.
Location :
Dhule,Dhule,Maharashtra
First Published :
November 26, 2023 2:46 PM IST
मराठी बातम्या/धुळे/
धुळ्यात चोरी करायला घरात शिरले चोर; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तरुणीलाही उचललं अन्..