उडिदाच्या डाळीच्या भाजीवरून वाद झाला, संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या पित्याला संपवलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दिनेश हा कोणतेही कामधंदा करत नव्हता आणि त्याने दोन-तीन वर्षांपूर्वी त्याची पत्नी गुड्डी हिला मारहाण करून माहेरी पाठवले होते.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
भुसावळ: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पालमध्ये २९ नोव्हेंबर २०२१ रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटना घडली आहे. उडिदाच्या डाळीच्या भाजीवरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.हा निकाल भुसावळ जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून पहिलीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या खटल्यात भारतीय दंड कलम ३०२ (खून) आणि ३२३ ( प्राणघातक हल्ला) अंतर्गत दोष सिद्ध झाल्याने हा निकाल देण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा अंतिम निकाल दिला असून, सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी यशस्वीपणे बाजू मांडली. तपासात पैरवी अधिकारी पो. कॉ. कांतीलाल कोळी, ज्ञानेश्वर चौधरी आणि इमराजा झटके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
advertisement
नेमकं काय झालं?
ही घटना पाल शिवारातील पुनमचंद मांगो पवार यांच्या शेतात घडली. बनाबाई नरसिंग बारेला (वय ३२, व्यवसाय: मजुरी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार (FIR EX39) तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आणि त्यांचे पती नरसिंग बारेला हे गेल्या एका वर्षापासून पुनमचंद पवार यांच्या शेतात राहत होते. शेतजमीन निम्म्या हिश्श्याने कसत होते. त्यांच्या शेजारी बनाबाई यांचे आई-वडील गीताबाई आणि अनाज्या बारेला राहत होते. बनाबाई यांचे तीन भाऊ असून, त्यापैकी मोठे भाऊ अंगारसिंग आणि सुनिल हे उस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. तिसरा भाऊ दिनेश उर्फ शिवा (आरोपी) हा त्याच्या तीन मुलांसह (लक्ष्मी, कृष्णा, भोला) शेजारी राहत होता. दिनेश हा कोणतेही कामधंदा करत नव्हता आणि त्याने दोन-तीन वर्षांपूर्वी त्याची पत्नी गुड्डी हिला मारहाण करून माहेरी पाठवले होते.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
October 18, 2025 8:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उडिदाच्या डाळीच्या भाजीवरून वाद झाला, संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या पित्याला संपवलं