सांगलीत मुळशी पॅटर्न घडवणारा श्याब्या निघाला खुंखार, गुन्हेगारी इतिहास आला समोर!
- Published by:Ravindra Mane
- Reported by:ASIF MURSAL
Last Updated:
Crime in Sangli: सांगली शहरातील गारपीर परिसर मध्यरात्री दुहेरी खुनाने हादरला आहे. इथं एका राजकीय नेत्याची मुळशी पॅटर्न स्टाईलने हत्या करण्यात आली आहे. आता हत्या करणाऱ्या आरोपीचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे.
सांगली शहरातील गारपीर परिसर मध्यरात्री दुहेरी खुनाने हादरला आहे. इथं एका राजकीय नेत्याची मुळशी पॅटर्न स्टाईलने हत्या करण्यात आली आहे. आरोपीनं वाढदिवशीच स्टेजवर जाऊन राजकीय नेत्याची हत्या केली. पण या घटनेनंतर वाढदिवसाला हजर झालेल्या संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरावर प्रतिहल्ला केला. यात हल्लेखोराचा जीव गेला आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अशाप्रकारे दोन खून झाल्याने सांगली शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
उत्तम मोहिते असं हत्या झालेल्या राजकीय नेत्याचं नाव आहे. ते दलित महासंघाचे नेते होते. तर श्याब्या उर्फ शाहरूख शेख असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. सांगलीतील दुहेरी हत्याकांडानंतर आता श्याब्याचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. यापूर्वी त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
श्याब्या शेखचा गुन्हेगारी इतिहास
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर शाहरुख शेख याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रामुख्याने मारामारी, ॲट्रॉसिटी, खून, जमावबंदी अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर 2016 मध्ये 2 गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याचे गुन्हे वाढत गेले. 2018 ला एक गुन्हा आणि 2021 ला दोन गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.
advertisement
दुसरीकडे, ज्यांची हत्या झाली ते राजकीय नेते उत्तम मोहिते यांची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे. त्यांच्यावर एकूण १० गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, मारामारी, धमकावणे, खंडणी, घरफोडी, हाफ मर्डर आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
सांगलीत मध्यरात्री नक्की काय घडलं?
दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. याच वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची मुळशी पटर्न चित्रपटाप्रमाणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर हल्लेखोरावर मोहिते समर्थकानी प्रती हल्ला केला होता, यात श्याऱ्या उर्फ श्याब्या शेख गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी शाब्या शहारूख शेख याला मृत घोषित केलं आहे. ही हत्या नक्की कोणत्या कारणातून केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 12, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीत मुळशी पॅटर्न घडवणारा श्याब्या निघाला खुंखार, गुन्हेगारी इतिहास आला समोर!


