Devendra Fadnavis : महायुतीचं सरकार आलं तर नवाब मलिकांना सोबत घेणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आम्ही...

Last Updated:

Devendra Fadnavis On Nawab Malik : नवाब मलिक यांच्याबद्दल काय चर्चा झाली? महायुतीचं सरकार आलं तर मलिक यांना सरकारमध्ये घेणार का? असं विचारलं असता फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

News18
News18
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दिवाळीत आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीय. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता नाराजांची मनधरणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यातच भाजपने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का दिला. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली आहे. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, आता अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. काल त्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीला मी अजित पवार, बावनकुळे, तटकरे हे होते. आम्ही बैठक घेऊन सर्व अडचणी सोडवल्या आहेत. त्यात कोणत्याही अडचणी नाहीत. ते तुम्हाला दिसेल. जे परत घेतले पाहिजे असे क्रॉस फॉर्म परत घेतील.
advertisement
काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे. एकमेकांच्या उमेदवारासमोर लोक उभा झाले आहेत. त्यासाठीही निती तयार केलीय. तिन्ही पक्ष मिळून तिकीट नसताना ज्यांनी उमेदवारी भरलीय त्यांचा उमेदवारी अर्ज परत घेण्याचा प्रयत्न असेल. पक्षांतर्गतही काही कार्यकर्ते उभा झाले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन, योग्य चर्चा करून परत घ्यायला लावण्याचा प्रयत्न असेल असंही फडणवीस म्हणाले
advertisement
नवाब मलिक यांच्याबद्दल काय चर्चा झाली? महायुतीचं सरकार आलं तर मलिक यांना सरकारमध्ये घेणार का? असं विचारलं असता फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं की, मलिक यांना आम्ही घेणारच नाही. आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला आहे आणि त्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करू. आशिष शेलार यांनी जी भूमिका मांडलीय तीच भूमिका अधिकृत आहे. त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ
advertisement
गोपाळ शेट्टी यांच्या बंडखोरीबद्दल विचारले असता फडणवीस यांनी सांगितलं की, पक्षातील काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. गोपाळ शेट्टी यांनी अर्ज भरलाय. ते पक्षाचे प्रामाणिक असे सैनिक राहिले आहेत. ते अनेकदा आग्रही असतात, ते पक्षशिस्त मान्य करतात. त्यांनी जी भाजपच्या मागे राहण्याची भूमिका घेतली तीच कायम रहावी अशी आमची अपेक्षा आहे
advertisement
फडणवीस यांनी यावेळी आणखी काही काँग्रेस नेते संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये येतील फक्त त्यांची नावं विचारू नका असं म्हटलं. फडणवीस म्हणाले की, २३ वर्षे बेस्टचे सदस्य म्हणून काम केलं, बेस्टच्या संदर्भात मुंबई महानगर पालिकेत अथॉरिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रचंड मोठा जनसंपर्क आहे, एक मोठा कनेक्ट काँग्रेसच्या नेत्यांशी आहे. त्याचा निश्चितच येत्या काळात आम्हाला फायदा होईल. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल.
advertisement
महायुतीत बंडखोरी का झाली?
२८८ पैकी ८-१० ठिकाणी बंडखोरी झालीय. किती मोठ्या प्रमाणावर समन्वय झालाय. त्यांचं काय झालंयय़ कळलंच नाही महाविकास आघाडीत काय सुरूय, तुम्हाला कळलं असेल तर सांगा? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : महायुतीचं सरकार आलं तर नवाब मलिकांना सोबत घेणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आम्ही...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement