Pankaja Munde: 'रात्रीच्या वेळी ईडीसारख्या धाडी टाकण्याचे दिले आदेश', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
- Published by:Sachin S
Last Updated:
नाशिकमध्ये उद्योजक संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक : महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून मध्यंतरी आमदारांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. पण आता भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या खात्याला निधी नसल्याचं बोलून खंत व्यक्त केली आहे. तसंच, नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्लांटवर रात्रीच्या वेळी ईडीसारख्या धाडी टाका अशा सूचना मी माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलं.
advertisement
नाशिकमध्ये उद्योजक संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या. यावेळी उद्योजकांनी सीइटीपी प्लांट उभारणीची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं.
'सीईटीपी प्लांट आम्ही करू, पण शासनाने आम्हाला थोडी मदत करावी. माझं काम पोलिसासारखे शिट्टी वाजवण्याचं आहे. उद्योग विभागाला मी विनंती करणार आहे. पण माझ्या खात्याकडे बजेट नाही. माझ्या खात्याला बजेट म्हणजे उद्योग विभागाच्या चुका आहे. त्यांना फाईन दिल्यावर आम्हाला बजेट मिळतं, असं म्हणत पंकजा मुंडेंनी एकाप्रकारे आपली नाराजी बोलून दाखवली.
advertisement
तसंच, 'हा इंडस्ट्रीचा विषय उद्योग आणि पर्यावरण अशा दोन विभागांशी निगडीत आहे. आमचं खातं हे फाईन गोळा करतो. त्यावर आमच्या खात्याला निधी मिळतो. त्यामुळे आमच्याकडे यासाठी स्वतंत्र निधी नाही. शिवाय नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्लांटवर रात्रीच्या वेळी ईडीसारख्या धाडी टाका अशा सूचना मी माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे, असंही मुंडेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
advertisement
'वातावरणीय बदल हे खाते सुद्धा माझ्याकडे आहे. बेभरोश्याचे वातावरण झाले आहे. शुगर इंडस्ट्री सुद्धा आहेत, टायर जाळून ऑइल बनविणारे, खाणी आणि वाळूबाबत आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. पर्यावरण खाते mpcb पर्यंत मर्यादित नाही. उद्योगाच्या विरोधात आमची भूमिका नाही उद्योगाला शक्ती देऊन आम्ही पर्यावरणाचे काम करू. जेवढे पाणी वापरतो त्यातील 48 टक्के पाणी तसंच नदीत जाते. काही नद्यांचे पाणी गटारीच झाले आहेत. नमामी गंगेचा मी आढावा घेतला त्यात प्रगती दिसली नाही. एखादी जागा घेतो तेव्हा त्याला सुविधा दिल्या पाहिजे. टॅक्स देतो ना? त्यावरच देश चालतो. नियम आणि कायदा आहे त्याचे पालन झाले पाहिजे, असंही मुंडेंनी बजावलं.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 02, 2025 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde: 'रात्रीच्या वेळी ईडीसारख्या धाडी टाकण्याचे दिले आदेश', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?