ED Raids In Baramati : एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी कारवाई
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
ED Raids Baramati : ईडीने आज बारामतीमधील ३ ठिकाणी आणि पुण्यातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापा मारल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने थेट बारामतीमध्ये कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई/पुणे: मागील काही काळात कोट्यवधींचे घोटाळे समोर येत आहेत. गुंतवणुकीशी संबंधित प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई केली. ईडीने आज बारामतीमधील ३ ठिकाणी आणि पुण्यातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापा मारल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने थेट बारामतीमध्ये कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दुग्ध क्षेत्रातील गुंतवणुकीवर ‘उच्च परतावा’ देण्याचे आमिष दाखवून तब्बल 10 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी ईडीने आज मोठी कारवाई केली. पुण्यातील दोन आणि बारामतीतील तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत महत्त्वाचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई विद्यानंद धायरी आणि आनंद लोखंडे या दोघांशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून करण्यात आली. हा संपूर्ण घोटाळा एका दाम्पत्याद्वारे रचला गेल्याचे समोर आले. त्यांनी पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध उद्योगात प्रचंड नफा देण्याचे आश्वासन दिले. गुंतवणुकीवर ‘आकर्षक परतावा’ मिळेल या नावाखाली तब्बल 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी गोळा केली. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
advertisement
बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने या प्रकरणी आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे (दोघेही जलोची, तालुका बारामती) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कंपनीची 10 कोटी 21 लाखांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. पैशांचे व्यवहार, बँक खात्यांतून झालेले व्यवहार आणि गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम तपासण्यासाठी ईडीने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
advertisement
सध्या ईडी या दाम्पत्याने गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम कोठे वळवली, किती जणांची फसवणूक झाली आणि या व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत सखोल तपास करत आहे. संपूर्ण प्रकरणामुळे पुणे–बारामती परिसरातील दुग्ध व्यवसाय आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 12:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ED Raids In Baramati : एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी कारवाई









