Ladki Bahin Yojana : अजित पवारांच्या पुण्यात सर्वाधिक बोगस ‘लाडक्या’, बाकी मंत्र्यांच्या जिल्ह्यांतील स्थिती काय? पाहा यादी

Last Updated:

Ladki Bahin Yojana : प्रशासनाने केलेल्या पडताळणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

fake beneficiaries ladki bahin yojana
fake beneficiaries ladki bahin yojana
मुंबई: विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी योजनेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याची चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या आधी पुरेशी पडताळणी न करता योजनेचा लाभ देण्यात आला. निवडणूक निकालानंतर निकषांची काटेकोर बजावणी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. प्रशासनाने केलेल्या पडताळणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने २६ लाखांहून अधिक लाभार्थींचा निधी रोखला आहे.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सरकारने हाती घेतलेल्या शोधमोहिमेत तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थी समोर आले असून, यामुळे दरमहा कोट्यवधी रुपयांचा निधी अपात्र महिलांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण राज्यातील पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पद्धतीने नव्याने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
'दैनिक लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वाधिक अपात्र लाभार्थी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात (२ लाख ४ हजार) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात (१ लाख २५ हजार ३००) आढळले. त्याचप्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात १ लाख २५ हजार ७५६, तर नाशिकमध्ये (छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ) १ लाख ८६ हजार ८०० अपात्र लाभार्थी असल्याचे समोर आले आहे.
advertisement
इतर जिल्ह्यांमध्येही बोगस लाभार्थ्यांची मोठी संख्या नोंदली गेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४ हजार ७००, कोल्हापूरमध्ये १ लाख १४००, मुंबई उपनगरात १ लाख १३ हजार, तर नागपूरमध्ये ९५ हजार ५०० अपात्र लाभार्थी आढळले आहेत. रायगड (६३ हजार), बीड (७१ हजार), लातूर (६९ हजार), सोलापूर (१ लाख ४ हजार), सांगली (९० हजार), सातारा (८६ हजार), नांदेड (९२ हजार) आणि जालना (७३ हजार) जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement

कोणत्या जिल्ह्यात कमी बोगस लाभार्थी?

सर्वात कमी बोगस लाभार्थी गडचिरोली (१८ हजार), वर्धा (२१ हजार) आणि भंडारा व सिंधुदुर्ग (२२ हजार) जिल्ह्यांत नोंदले गेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, या निकषाचा भंग करून अनेकांनी योजना हडप केली. त्यामुळे सरकारने आता प्राप्तिकर विभागाकडून आयकरदात्या महिलांची माहिती मागवली असून पडताळणी प्रक्रिया कडक करण्याचे संकेत दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana : अजित पवारांच्या पुण्यात सर्वाधिक बोगस ‘लाडक्या’, बाकी मंत्र्यांच्या जिल्ह्यांतील स्थिती काय? पाहा यादी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement