Solapur Goa Flight: अखेर 'मुहूर्त' ठरला! सोलापूरातून मुंबई अन् गोव्यासाठी रोज विमानसेवा; वेळापत्रक अन् तिकीट दर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Goa Flight: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी असून मुंबई आणि गोव्याला आता रोज विमान झेपावणार आहे. 1 नोव्हेंबरपासून मुंबईसाठी रोज विमानसेवा सुरू होत आहे.
सोलापूर: सोलापूरहून मुंबई आणि गोव्याला प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या दोन्ही मार्गांवर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअरलाईन्सकडून सोलापूर-मुंबई मार्गावर सध्या चार दिवस असणारी विमासेवा 1 नोव्हेंबरपासून सात दिवस होणार आहे. तर ‘फ्लाय 91’नेही प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर रोज विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
सोलापूर – मुंबई रोज विमानसेवा
15 ऑक्टोबर रोजी सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यापासून आठवड्यातील चार दिवस उड्डाण सुरू होते. आता 1 नोव्हेंबरपासून सोलापूर विमानतळावरून मुंबईसाठी रोज विमान झेपावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा प्रवास जलद होणार असून वेळेची बचत होईल.
मुंबई आणि सोलापूर दरम्यान विमासेवा दररोज सुरू करण्याची मागणी होती. आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने ही सेवा रोज सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून आठवड्यातील सातही दिवस स्टार एअरलाईन्सकडून ही सेवा सुरू करण्यात येईल. सध्या मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू आहे.
advertisement
सोलापूर गोवा विमान रोज झेपावणार
सोलापूर-गोवा मार्गावर विमान प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘फ्लाय 91’ने ही विमानसेवा रो ज सुरू करण्याची तयारी चालवली आहे. सध्या कंपनीकडे 3 एअरक्राफ्ट असून कंपनीच्या ताफ्यात चौथे विमान दाखल झाल्यावर ही विमानसेवा सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गोव्यासाठी रोज विमानसेवा सुरू होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांमनी सांगितले.
advertisement
वेळापत्रकात बदल
सोलापूर-गोवा विमानाच्या वेळापत्रकात रविवार, 26 ऑक्टोबरपासून बदल करण्यात आले आहेत. आता दुपारी 2.35 वाजता गोव्याचे विमान सोलापुरात येत असून 2.55 वाजता परतीच्या प्रवासासाठी पुन्हा झेपावत आहे. पूर्वी हेच वेळापत्रक सकाळचे होते. वेळापत्रकातील या बदलाला देखील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तिकीट दर काय?
view commentsसोलापूर मुंबई विमानाचा प्रारंभिक दर 3999 रुपये आहे. तर सध्याचे कमी दर (ऑक्टोबर 2025) साठी ते 3499 रुपयांवर होते. तर यापेक्षा गोव्याचे तिकीट दर कमी आहेत. त्यामुळे गोव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गोव्याच्या तुलनेत मुंबईसाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपबल्ध असून तीन-चार रेल्वे आणि वंदे भारतचाही पर्याय आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 28, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Goa Flight: अखेर 'मुहूर्त' ठरला! सोलापूरातून मुंबई अन् गोव्यासाठी रोज विमानसेवा; वेळापत्रक अन् तिकीट दर


