Nanded Mumbai Flight: मुहूर्त ठरला! नांदेडहून गोवा, मुंबईसाठी विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?

Last Updated:

Nanded Mumbai Flight: नांदेड ते मुंबई आणि गोवा या दोन्ही विमानसेवा स्टार एअर मार्फत सुरू होत आहेत. या सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहेत.

Nanded Mumbai Flight: मुहूर्त ठरला! नांदेडहून गोवा, मुंबईसाठी विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?
Nanded Mumbai Flight: मुहूर्त ठरला! नांदेडहून गोवा, मुंबईसाठी विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?
नांदेड : नांदेडहून मुंबई आणि गोव्याचा प्रवास आता अवघ्या तासाभरात होणार आहे. बहुप्रतीक्षित विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून 15 नोव्हेंबर रोजी पहिले विमान झेपावणार आहे. नांदेड – मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबईऐवजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच स्लॉट देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे.
नांदेड ते मुंबई आणि गोवा या दोन्ही विमानसेवा स्टार एअर मार्फत सुरू होत आहेत. या सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहेत, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नांदेडहून मुंबई, गोवा तासात
मुंबई- नांदेड विमान हे दुपारी 4:45 वाजता मुंबईहून उड्डाण करेल आणि सायंकाळी 5:55 वाजता नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंगजी विमानतळावर उतरेल. तेच विमान सायंकाळी 6:25 वाजता नांदेडहून उड्डाण करून रात्री 7:35 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल. तर गोवा-नांदेड विमान हे गोव्याच्या मोपा विमानतळावरून दुपारी 12 वाजता उड्डाण करून 1 वाजता नांदेडला पोहोचेल. परतीचे उड्डाण दुपारी 1:30 वाजता होऊन गोव्याला 2:40 वाजता पोहोचेल.
advertisement
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनाही लाभ
नांदेडहून मुंबई आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाल्याने त्याचा लाभ मराठवाड्यातील नांदेड शेजारच्या इतर जिल्ह्यांना देखील होणार आहे. नांदेड गोवा विमानसेवा सुरू झाल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. त्यात मुंबई आणि गोवा मार्गांची भर पडल्याने नांदेडहून सात ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Mumbai Flight: मुहूर्त ठरला! नांदेडहून गोवा, मुंबईसाठी विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement