Eknath Shinde : मित्रपक्षांकडूनच पाय खेचण्याचे प्रयत्न, शिंदे गट अॅक्शन मोडवर, जिल्हाप्रमुखांनाही दम! बैठकीत काय घडलं?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Eknath Shinde Maharashtra Local Body Election : मित्रपक्षांकडूनच घेरण्याचा प्रयत्न होत असल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता शिंदे गटानेही आपला पवित्रा आक्रमक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमध्येही सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. मित्रपक्षांकडूनच घेरण्याचा प्रयत्न होत असल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता शिंदे गटानेही आपला पवित्रा आक्रमक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील जिल्हा पातळीवरील संघटनात्मक हालचालींना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार व जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली.
advertisement
पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल...
या बैठकीत अकार्यक्षम जिल्हाप्रमुखांना मोरे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत वारंवार भेटींसाठी न येता जिल्ह्यांतील संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रीत करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. यासोबतच, “बोलवल्याशिवाय मुंबईत यायचे नाही” असा स्पष्ट दम देखील जिल्हाप्रमुखांना देण्यात आल्याचे समजते.
advertisement
मोरे यांनी पदभरती प्रक्रिया गतीमान करून, रिक्त पदनियुक्त्या करून पक्षाची बांधणी मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हा संघटनांनी कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संपर्क वाढवावा, अशा सूचना देण्यात आल्या.
शिंदे गट भाकरी फिरवणार...
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातही भाकरी फिरवली जाणार असणार असल्याची चर्चा आहे. अकार्यक्षम जिल्हाप्रमुखांना लवकरच बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या बळावर उमेदवार उभे करण्याबाबतची चाचपणीही सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
मित्रपक्षांकडून कोंडी, शिंदे गटही स्वबळावर?
विशेष म्हणजे, रायगड, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये मित्र पक्षांकडूनच पाय खेचला जात असल्याच्या तक्रारींमुळे, या जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या बाजूने आहेत. या घडामोडींमुळे शिंदे गटात हालचालींना वेग आला असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रणांगणात शिवसेना स्वतःची ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 9:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : मित्रपक्षांकडूनच पाय खेचण्याचे प्रयत्न, शिंदे गट अॅक्शन मोडवर, जिल्हाप्रमुखांनाही दम! बैठकीत काय घडलं?