advertisement

Shiv Sena Shinde : शिंदे गटाच्या शाखेवरून प्रभादेवीत जोरदार वादावादी, स्थानिकांचा मोठा विरोध, नेमकं झालं काय?

Last Updated:

Shiv Sena Shinde Clash : मुंबईतील प्रभादेवीमध्ये जोरदार वादावादी झाली. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार वाद झाला.

Rapid Read
शिंदे गटाच्या शाखेवरून प्रभादेवीत जोरदार वादावादी, स्थानिकांचा मोठा विरोध, नेमकं झालं काय?
शिंदे गटाच्या शाखेवरून प्रभादेवीत जोरदार वादावादी, स्थानिकांचा मोठा विरोध, नेमकं झालं काय?
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे मुंबईतील प्रभादेवीमध्ये जोरदार वादावादी झाली. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार वाद झाला. शिवसेना शाखेवरून हा वाद झाला. स्थानिकांसोबत वाद वाढल्यानंतर समाधान सरवणकर यांना काढता पाय घ्यावा लागला.
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे आहेत. जानेवारी २०२६ मध्ये मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच सगळ्या राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर या भागात ठाकरे आणि शिंदे गटात याआधी राडे झाले आहेत.
advertisement
आज, रविवारी, प्रभादेवीतील साई सुंदर इमारत परिसरात रविवारी मोठा गोंधळ उडाला. शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिक यांच्यात तात्पुरत्या शाखेच्या बांधकामावरून जोरदार वाद झाला. परिस्थिती इतकी बिघडली की अखेर सरवणकर यांना नागरिकांच्या रोषामुळे घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला.

नेमकं काय झालं?

साई सुंदर इमारत परिसरात शिंदे गटाचे कार्यालय आहे. याच कार्यालयासमोर तात्पुरते छोटे शेड उभारले गेले होते. मात्र आता त्याच जागेवर मोठ्या आणि कायमस्वरूपी शेडचे बांधकाम सुरू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला. नागरिकांनी यावर थेट आक्षेप घेतला. अतिशय अरुंद जागेत होत असलेले हे बांधकाम आपत्कालीन परिस्थितीत ये-जा करण्याला अडथळा ठरेल आणि परिसरातील सुरक्षेलाच धोका निर्माण होईल, असा आक्षेप स्थानिकांनी घेतला. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने शाखेसमोर जमा झाले आणि बांधकामाला विरोध केला. वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचे दिसताच समाधान सरवणकर आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी परिसरातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला होता.
advertisement

काढता पाय घेण्यास भाग पाडले

परिस्थिती अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता, कोणताही गोंधळ वाढू नये म्हणून समाधान सरवणकरांनी काढता पाय घेतला. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना घडलेली या घटनेने स्थानिक राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena Shinde : शिंदे गटाच्या शाखेवरून प्रभादेवीत जोरदार वादावादी, स्थानिकांचा मोठा विरोध, नेमकं झालं काय?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement