त्यांनी वरळीत धक्काबुक्की केली... आमदार पुत्राविरोधात शिंदे गटाच्या महिला शाखाध्यक्षाकडून तक्रार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Aaditya Thackeray vs Eknath Shinde: नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले होते.
मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वरळी महिला शाखा प्रमुखांनी युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सिद्धेश शिंदे हे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र आहेत. वरळीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या महिला शाखा प्रमुखांनी केला आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपापल्या नेत्यांना प्रोत्साहन दिले. दोन्ही सेना कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असल्याने धक्काबुक्कीही झाली.
आमदार पुत्राविरोधात पोलिसांत तक्रार
advertisement
वरळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत वरळीच्या शिंदे गटाच्या महिला शाखा प्रमुखांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीस ठाण्यात सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. संबंधित महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आलेले असताना गर्दी शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महिला शाखाध्यक्षांनी केला आहे.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
वरळी येथील कोळीवाड्यात आयोजित कार्यक्रमाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी आल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावाचे होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. रस्ता अरूंद असल्याने काहीशी धक्काबुक्की झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
advertisement
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले. त्यामुळे सण समारंभाला आदित्य ठाकरे मतदारसंघात आवर्जून उपस्थिती लावतात. यंदा नारळी पौर्णिमेला एकनाथ शिंदे यांनीही कोळी बांधवांचा सन्मान ठेवत कोळीवाड्यात उपस्थिती लावली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्यांनी वरळीत धक्काबुक्की केली... आमदार पुत्राविरोधात शिंदे गटाच्या महिला शाखाध्यक्षाकडून तक्रार