जावयाच्या अंत्यविधीवरून येताना सासऱ्याचा अपघात, Hyundai Venue नदीत कोसळली; दोघांचा मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Chandrapur Accident: अरुंद पुलावरून येताना वाहनाचा तोल गेल्याने हुंडई व्हेन्यू ही कार थेट दिना नदीत कोसळली.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–आष्टी महामार्ग क्रमांक 353 वरील दिना नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. पुलावरून गाडी खाली नदीत पडल्याने दोघांचा मृत्यू झाला असून तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागेपली येथील व्यापारी सतीश कोलपाकवार जावयाच्या अंत्यविधीवरून परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अरुंद पुलावरून येताना वाहनाचा तोल गेल्याने हुंडई व्हेन्यू ही कार थेट दिना नदीत कोसळली.
समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश कोलपाकवार य हे जावयाचा अंत्यविधी आटोपून येत होते. या वेळी कारमध्ये पाच जण होते. आलापल्लीहून आष्टीकडे कारने परतताना दिना नदीवरील पुलावरून जात होते.
अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने तोल गेला आणि कार ही नदीत कोसळली . अपघात इतका भीषण होता की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.
advertisement
प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले
या अपघातात यादव कोल्पाकवार (रा. आष्टी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुनील कोल्पाकवार (रा. आष्टी) यांना गंभीर अवस्थेत अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमध्ये प्रवास करणारे उर्वरित तीन जण गंभीर जखमी असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
advertisement
पंचनामा करून अपघाताची नोंद
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीत कोसळलेल्या कारमधून जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
कोलपाकवार कुटुंबावर शोककळा
दरम्यान, दिना नदीवरील पुलाची अरुंद रचना, अपुरे संरक्षक कठडे आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता पुलाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दुर्घटनेमुळे कोलपाकवार कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 4:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जावयाच्या अंत्यविधीवरून येताना सासऱ्याचा अपघात, Hyundai Venue नदीत कोसळली; दोघांचा मृत्यू









