Beed News: 5 वर्षाच्या पोरीवर अत्याचार, पोराला वाचवण्यासाठी पोलीस आणि अख्खं गाव एकवटलं; बीडची घटना

Last Updated:

Beed News: मुलीच्या आईवर देखील प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

News18
News18
बीड : बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेपेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या नराधम मुलावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी संपूर्ण गाव एकवटलं होतं. तसेच मुलीच्या आईवर देखील प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीडमध्ये एका साडेपाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर मुलीला असह्य वेदना होत असतानाही ग्रामस्थांनी गावाची बदनामी नको यासाठी पीडित कुटुंबाला उपचारासाठी बीड येथे जाऊ दिले नाही. चार दिवस चिमुकली त्रास सहन करत होती.
advertisement

मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू

अखेर मुलीच्या नात्यातील काही व्यक्तींना ही घटना समजली. त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर कासार पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला. पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीच्या नात्यातील व्यक्तींना घटना समजल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना संपर्क केला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. चार दिवस घरात वेदना असाह्य झाल्यानंतर अखेर मुलीच्या आईने उपचारासाठी बीड गाठले आणि सध्या पीडित चिमुरडीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement

पीडित कुटुंबालाच गावकऱ्यांकडून धमकी

पीडियत मुलीच्या नात्यातीलच एका नराधमाने हे कुकर्म केल्यामुळे बदनामी नको म्हणून पीडित कुटुंबालाच गावकऱ्याकडून धमकी देण्यात येत होती. या संपूर्ण संतापजनक घटनेची आपबीती सांगत असताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले. या नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गावातील लोकांनी पीडित मुलीच्या आईवर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप आहे. बदनामीच्या भीतीने ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पीडित मुलीला तब्बल चार दिवस उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही, असा संतापजनक प्रकार प्राथमिक तपासात उघड झाला आहे. पीडित मुलीची आई, आजी आणि पती रोज पोलिसांकडे जात होते, मात्र पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही.
advertisement

पोलिसांवर कारवाईची मागणी

पोस्कोमधला गुन्हा तात्काळ नोंदवून घेतला पाहिजे गुन्हा नोंद करून घेण्यास दिरंगाई करणे हा देखील गुन्हाच आहे. त्यामुळे शिरूर कासार पोलिसांवर देखील या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: 5 वर्षाच्या पोरीवर अत्याचार, पोराला वाचवण्यासाठी पोलीस आणि अख्खं गाव एकवटलं; बीडची घटना
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement