Dharmarao Atram : किंमत मोजावी लागेल, राष्ट्रवादीच्या मंत्र्याला माओवाद्यांकडून पुन्हा धमकी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांना तब्बल तिसऱ्यांदा धमकी दिली आहे. या संदर्भात गट्टा येथे पत्रके आढळली आहेत.
महेश तिवारी, 20 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सुरजागड येथील लोह खनिज प्रकल्पात उत्खनन सुरू आहे. या प्रकल्पाला माओवाद्यांकडून सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. विरोध म्हणून माओवाद्यांकडून हिंसक कारवायासुद्धा केल्या गेल्या आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव अत्राम यांना माओवाद्यांना सुरजागड प्रकल्पावरून धमकी दिलीय.
सुरजागड प्रकल्पावरून माओवाद्यांनी या भागाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांना तब्बल तिसऱ्यांदा धमकी दिली आहे. या संदर्भात गट्टा येथे पत्रके आढळली असून माओवाद्यांनी त्यात धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह त्यांचे जावई ऋतुराज त्यांचे भाऊ यासह कंपनीसाठी काम करणाऱ्या काही लोकांची नावे नमूद केली आहेत. सुरजागड येथील लोह खनिज उत्खननासाठी धर्मराव हे जबाबदार असून त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा धमकीवजा इशारा माओवाद्यांच्या त्या पत्रकात देण्यात आला आहे.
advertisement
माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचे श्रीनिवास यांच्या नावाने हे पत्रक या ठिकाणी आढळले आहे. वर्षभरात धर्मरावा बाबा यांना तब्बल तिसऱ्यांदा माओवाद्यांची अशी धमकी आली आहे .गेल्यावेळी हिवाळी अधिवेशनातही माओवाद्यांनी धर्मराव आत्राम यांना धमकी दिली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देश दिले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2023 8:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Dharmarao Atram : किंमत मोजावी लागेल, राष्ट्रवादीच्या मंत्र्याला माओवाद्यांकडून पुन्हा धमकी

