Ganapati Visarjan : कोकणात विसर्जनाला गालबोट, दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना 3 जण वाहून गेले, खेडमध्ये दुदैवी घटना

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत जगबुडी नदीत आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सूरू होते.यावेळी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चार ते पाच जण पाण्यात उतरले होते.

ganpati visarjan 2025
ganpati visarjan 2025
Ganapati Visarjan : राज्यभरात काल 27 ऑगस्टला अनेकांच्या घरात गपणतीचे आगमन झाले आहे. या आगमनानंतर आज दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन झाले आहे.या विसर्जना दरम्यान जगबुडी नदीत उतरलेल्या तीन जण वाहून केल्याची घटना घडली आहे. त्यामधील दोघांना वाचवण्यात यश आले आहे, तर एकजण अजूनही बेपत्ता आहे. त्यामुळे त्याची शोधाशोध सूरू करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत जगबुडी नदीत आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सूरू होते.यावेळी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चार ते पाच जण पाण्यात उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण वाहून गेले होते. त्यातील दोघे जण कसेबसे किनाऱ्यावर आले होते.तर एकाचा अद्याप शोध लागला नाही आहे. त्यामळे त्याचे शोध कार्य सुरू आहे. ही घटना आज साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
advertisement
दरम्यान गेल्या दोन ते तीन तासांपासून वाहून गेलेल्या गणेश भक्ताचे शोध कार्य सुरू आहे.घटनास्थळी खेड पोलीस दाखल झाले असून विसर्जन कट्टा तसेच रेस्क्यू टीम देखील दाखल झाले आहे.आणि त्या बेपत्ता व्यक्तीचा शोध सूरू आहे.त्यामुळे आता या व्यक्तीचा शोध लागतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
advertisement
ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganapati Visarjan : कोकणात विसर्जनाला गालबोट, दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना 3 जण वाहून गेले, खेडमध्ये दुदैवी घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement