अनंत गर्जे खिडकीतून 30 व्या मजल्यावर गेला? फॉरेन्सिक टीमने दिली मोठी अपडेट

Last Updated:

अनंत गर्जेच्या अटकेनंतर फॉरेन्सिक टीम वरळीतील त्याच्या घरी दाखल झाली आहे. डॉ. राजेश ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घराची सखोल पाहणी केली आहे.

News18
News18
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. एका उच्चशिक्षित तरुणीने अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अनंत गर्जेला अटक केली आहे.
या अटकेनंतर फॉरेन्सिक टीम अनंत गर्जेच्या घरी दाखल झाली आहे. डॉ. राजेश ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घराची सखोल पाहणी केली आहे. पोलिसांनी काही प्राथमिक पुरावे सापडले आहेत. याबाबत पोलिसांशी चर्चा केल्यानंतर सर्व माहिती अंतिम अहवालात समाविष्ट केली जाईल, अशी माहिती ढेरे यांनी दिली.
तसेच त्यांनी अनंत गर्जे याने केलेल्या दाव्यावर देखील भाष्य केलं. ज्यावेळी गौरीने आत्महत्या केली, त्यावेळी अनंत गर्जे घरी नव्हता. आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच गर्जे घरी आला. त्याने ३० व्या मजल्यावर चढून खिडकीतून घरात प्रवेश केल्याचं सांगितलं होतं. या दाव्यावर आता फॉरेन्सिक टीमचे अधिकारी राजेश ढेरे यांनी भाष्य केलं आहे.
advertisement
अनंत गर्जे ३० व्या मजल्यावर खिडकीतून गेला का? यबाबत विचारला असता ढेरे यांनी सांगितलं, "आता आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत. तिथे आम्ही उर्वरित माहिती देऊ. सध्या आम्ही फक्त प्राथमिक तपासणी केली आहे. बाकी माहितीबाबत आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू... त्यानंतर ती माहिती रिपोर्टमध्ये समाविष्ट करून अंतिम रिपोर्ट तयार करू..."
advertisement
फॉरेन्सिक तपासणीबद्दल माहिती देताना ढेरे पुढे म्हणाले की, "फॉरेन्सिक चाचणीसाठी आवश्यक असणारे सगळे सँपल आम्ही लॅबला पाठवले आहेत. पॅथालॉजी विभागाकडून मायक्रोस्कोप खाली केली जाणारी तपासणीही आम्ही करणार आहेत. यातून तक्रारदाराने किंवा पोलिसांना माहीत नसलेले महत्त्वाचे पुरावे मिळतात का? याची तपासणी करणार आहोत. आम्ही पूर्णपणे हा तपास वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करूनच आम्ही अंतिम अहवाल बनवणार आहोत."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अनंत गर्जे खिडकीतून 30 व्या मजल्यावर गेला? फॉरेन्सिक टीमने दिली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Raj Thackeray On BMC Election : 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक
  • 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक

  • 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक

  • 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक

View All
advertisement