Pandharpur: 'माझ्या भावाला आणि नगरसेवकांना VIP दर्शन द्या', शिवसेना आमदार बांगर यांचा विठ्ठल मंदिर समितीवर दबाव
- Published by:sachin Salve
Last Updated:
राज्यभरातून लाखो वारकरी हे एक एक टप्पा पार करत पायी चालत पंढपूरच्या दिशेनं निघाले आहे. पण दुसरीकडे पंढरपूरच्या मंदिरात दर्शनासाठी...
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी
पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठीलाखो वारकरी शेकडो किलोमिटर पायी चालून पंढरपुरात दाखल होतात. राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठलनगरीत पोहोचतात. तासंतास रांगेत उभं राहून विठुरायाचं दर्शन घेतात. पण, गरिबांच्या या विठुरायाच्या मंदिरात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार बांगर यांनी पत्रच विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीला पाठवल्याचं समोर आलं आहे.
advertisement
राज्यभरातून लाखो वारकरी हे एक एक टप्पा पार करत पायी चालत पंढपूरच्या दिशेनं निघाले आहे. पण दुसरीकडे पंढरपूरच्या मंदिरात दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकण्याचे प्रकार समोर आले आहे. पंढरपूर मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंदिर समितीवर दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगर यांनी आपला भाऊ बांधकाम सभापती आणि नगरसेवक असलेले श्रीराम बांगर यांच्यासह इतर 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला पत्र पाठवलं आहे.
advertisement

व्हीआयपी दर्शन बंद असतानाही आपल्या भावाला आणि त्यांच्या नगरसेवकाला दर्शन द्या, अशी मागणी करत बांगर यांनी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिर समितीने आधीच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी व्हीआयपी दर्शनाला आळा घातला असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण असं असतानाही आमदार बांगर यांनी आपल्या लेटर हेडवर मंदिर समितीला पत्रच पाठवलं आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेत किमान 50 हजार भाविक उभे आहेत. असं असताना आमदार महोदयांनीच समितीला २१ जणांसाठी पत्र पाठवलं आहे. व्हीआयपी दर्शन बंद असतानाही आमदार बांगर यांनी पत्र का पाठवलं, याबद्दल त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
advertisement
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या विचारात घेता मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केलं होतं. आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासंतास ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे, यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही, असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला होता.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
June 28, 2025 9:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: 'माझ्या भावाला आणि नगरसेवकांना VIP दर्शन द्या', शिवसेना आमदार बांगर यांचा विठ्ठल मंदिर समितीवर दबाव