advertisement

मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला, डोहाच्या पाण्यामध्ये बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

Last Updated:

Gondia News: मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा डोहाच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे.

गोंदिया बातम्या
गोंदिया बातम्या
गोंदिया, गोरेगाव: डोहाच्या पाण्यामध्ये बुडून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंश बारेवार (15) असे मृतक मुलाचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हलबीटोला येथील ही घटना आहे.
मृतक अंश हा काल दुपारी आपल्या मित्रासोबत हलबीटोला शमशानघाट परिसरात असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेला होता. याच पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंशच्या घरच्या लोकांनी अंश बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलिसात काल रात्री दिली होती.
पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना विचारपूस केल्यानंतर सदर प्रकार पुढे आला. आज दिनांक 22 एप्रिल रोजी मंगळवारी हलबीटोला शमशान घाट येथील खोल पाण्यातून अंशचे प्रेत गोताखोराच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला, डोहाच्या पाण्यामध्ये बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement