आणखी एक नशेचा बळी, कपडे धूत असलेल्या महिलेला ट्र्रॅक्टरखाली चिरडलं, गोंदियातील घटना

Last Updated:

मद्यधुंद अवस्थेत असताना लोकांकडून अनेक अपघात होतात. स्वतःवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना शुद्धही नसते की आपण काय करतोय. त्यामुळे मद्यधुंद लोकांकडून अपघात झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.

कपडे धूत असलेल्या महिलेला ट्र्रॅक्टरखाली चिरडलं
कपडे धूत असलेल्या महिलेला ट्र्रॅक्टरखाली चिरडलं
रवी सपाटे, गोंदिया:  मद्यधुंद अवस्थेत असताना लोकांकडून अनेक अपघात होतात. स्वतःवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना शुद्धही नसते की आपण काय करतोय. त्यामुळे मद्यधुंद लोकांकडून अपघात झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच आणखी एक घटना गोंदियामधून समोर आलीय. ज्यामध्ये एका मद्यधुंद व्यक्तीकडून महिलेचा मृत्यू झाला आणि दोन मुली थोडक्यात बचावल्या.
जर रस्त्याच्या बाजूला आपले घर असेल तर जरा सावधान.... रस्त्यावरून ये जा करत असताना एखादा ट्रॅक्टर किंवा एखादी चार चाकी आपल्या घरात अनियंत्रित होऊन आपल्या परिवारातील एखाद्याच्या जीव जाऊ शकतो. अशीच एक घटना गोंदिया जिल्हयातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या किडांगीपार येथे घडली. श्रीमती किसना बुधराम चोरवाडे वय 58 वर्ष ही आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता. तो मद्यधुंद अवस्थेमध्ये ट्रॅक्टर चालवत होता.
advertisement
त्याचं ट्रॅक्टर वरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर चक्क किसाना बाई यांच्या घरामध्ये शिरला त्या मुळे ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसणा बाई यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नात जवळच होत्या मात्र त्या थोडक्यात बचावल्या अन्यथा आज ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तिघांचा जीव गेला असता मात्र या ट्रॅक्टर चालक च्या मद्यधुंद अवस्थेमुळे आज किसनाबाई आपल्या परिवाराला सोडून गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते.
advertisement
दरम्यान, ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35 जी 1637 हा आरटीओ द्वारा पासिंग केला नव्हता. ट्रॉली अद्यापही नवीन विना नंबर असून आणि ती सुद्धा आरटीओ द्वारा पासिंग केलेली नव्हती. याबाबत आता आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
आणखी एक नशेचा बळी, कपडे धूत असलेल्या महिलेला ट्र्रॅक्टरखाली चिरडलं, गोंदियातील घटना
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement