Badlapur to Kanjurmarg Metro : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! अडीज तासांचा प्रवास 60 मिनिटांत; कांजूरमार्ग मेट्रो कधी सुरु होणार?

Last Updated:

Badlapur to Kanjurmarg Metro Update :बदलापूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता अडीज तासांचा प्रवास आता फक्त साठ मिनिटांत पूर्ण होईल.

News18
News18
मुंबई : भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरी वाहतुकीच्या प्रकल्पांचा विकास सुरू आहे. ज्यामध्ये मेट्रो प्रकल्प हे प्रमुख केंद्रबिंदू ठरत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई महानगरातील मेट्रो प्रकल्प विशेष लक्षवेधी आहेत कारण येथे देशातील सर्वात लांब मेट्रो मार्ग बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बदलापूर ते कांजुरमार्गपर्यंत एक नवीन मेट्रो लाईन तयार करण्याचे ठरवले आहे. जी संपूर्ण भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग ठरेल. या प्रकल्पाद्वारे मुंबईतील रहिवाशांना प्रवासात मोठ्या प्रमाणावर सुविधा मिळणार आहेत.
कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट
एमएमआरडीए या मेट्रो प्रकल्पासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागीदारी करून काम करणार आहे. यासाठी प्राधिकरणाने निविदा काढल्या आहेत. ज्यामध्ये खाजगी कंपन्यांकडून मत जाणून घेण्यावर भर दिला आहे. या मेट्रो लाईनच्या पूर्ण होण्यास अंदाजे पाच वर्षांचा कालावधी लागेल आणि या प्रकल्पामुळे बदलापूरसह आसपासच्या भागातील नागरिकांना मुंबईत प्रवास करणे अत्यंत सोपे होईल. एमएमआरडीएची प्राथमिक इच्छा आहे की शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोक एका तासाच्या आत शहराच्या मध्यभागी पोहोचू शकतील.
advertisement
बदलापूर ते कांजुरमार्ग मेट्रो लाईन 14 हा अनेक मेट्रो लाईन्सपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सध्या या मार्गावर प्रवास करण्याचे एकमेव साधन लोकल ट्रेन आहे. परंतु, पावसाळ्यात लोकल ट्रेन देखील ठप्प होते. ज्यामुळे नागरिकांचा मुंबई शहराशी संपर्क तुटतो. एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की ही 38 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 7 लाख प्रवासी प्रवास करू शकतील.
advertisement
या मेट्रो प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईने डीपीआरचा अभ्यास करून प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. तसेच स्पेनमधील मिलान मेट्रो प्रशासनाने सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून ही मेट्रो बांधण्याची शिफारस केली आहे. निविदा अभिव्यक्ती स्वारस्य प्रकारची आहे. ज्याचा अर्थ असा की प्राधिकरण खाजगी कंपन्यांच्या संभाव्य सहभागाबाबत माहिती गोळा करीत आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 28 जुलै आहे आणि त्यानंतर निविदांची छाननी करून उर्वरित कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले जातील.
advertisement
ही मेट्रो लाईन सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत बांधली जाणार आहे. निविदा काढल्या गेल्या असल्या तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असेल. सूत्रांनुसार एमएमआरडीएचे उपाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाविषयी चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चर्चा करून राज्य मंत्रिमंडळाला मान्यता मिळेल. देशातील सर्व मेट्रो प्रकल्प केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या देखरेखीखाली येतात,त्यामुळे केंद्र सरकारलाही याची माहिती दिली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलापूर-कांजुरमार्ग मेट्रो लाईनचे बांधकाम 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
या प्रकल्पामुळे मुंबईत पाणी, वाहतूक, वाहतुकीचा वेळ आणि शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होईल. खाडी ओलांडणारी ही मेट्रो लाईन शहराच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि मुंबईकरांसाठी प्रवासाची नवी सोय उपलब्ध करून देईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Badlapur to Kanjurmarg Metro : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! अडीज तासांचा प्रवास 60 मिनिटांत; कांजूरमार्ग मेट्रो कधी सुरु होणार?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement