Bigg Boss 19 : 'चड्डीत राहा, संपूर्ण महाराष्ट्र माझं गाव', स्वाभिमान दुखावणाऱ्या बसीरला प्रणित मोरेनं झाप झाप झापलं, VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 Pranit More on Basir Ali : 'बिग बॉस 19'च्या घरात नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कदरम्यान मराळमोळ्या प्रणित मोरेने बसीर अलीला चांगलच सुनावलं आहे. अखेर प्रणितने बसीरची बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे.
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' सुरू झाल्यापासूनच चांगलच चर्चेत आहे. घरातील स्पर्धक, टास्क, सलमान खान अशा अनेक कारणांनी हे पर्व चर्चेत आहे. अशात मराठमोळा प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळालं आहे. 'गंदे डायनासॉर' या कॅप्टनसी टास्कदरम्यान प्रणित आणि बसीर यांच्यात वाद झाला. या टास्कदरम्यान प्रणितला केअर टेकर बनवण्यात आलं होतं. त्यावेळी प्रणित बसीरला "चड्डीत राहायचं, चल निघ", तसेच "संपूर्ण महाराष्ट्र माझं गाव", असल्याचं म्हणाला. याआधीही बसीरने प्रणितला 'गावी निघून जा" असं म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर सलमान खानने त्याची शाळा घेतली होती. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन बसीर आणि प्रणित यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे.
प्रणित मोरे काय म्हणाला?
कॅप्टनसी टास्कदरम्यान प्रणित मोरे म्हणाला,"बसीरला वाटतं की प्रत्येकवेळी तो मला नॉमिनेट करुन घरी पाठवेल. मला गावी जा असंही तो म्हणाला होता. पण त्याला माहिती नाही संपूर्ण महाराष्ट्र माझं गाव आहे. आता तू घरी जा. चड्डीत राहा. चल निघ. एकटा आलोय. एकटा घेऊन जाईल तुम्हाला सगळ्यांना". पुढे मी तुझ्यापेक्षा जा शोमध्ये जास्त दिवस टिकेल असंही प्रणित बसीरला म्हणतो. त्यानंतर बसीर आणि प्रणित 'बिग बॉस 19'मधून कोण आधी बाहेर जाणार याची पैज लावतात.
advertisement
Here is the #Pranitmore for u 🔥
" Maharashtra and India Is my Village"
It's time to show love for our More ..#VoteForPranitMore 🙏#BiggBoss19 #BB19 pic.twitter.com/XzIKQZ9DXP
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bigg Boss 19 : 'चड्डीत राहा, संपूर्ण महाराष्ट्र माझं गाव', स्वाभिमान दुखावणाऱ्या बसीरला प्रणित मोरेनं झाप झाप झापलं, VIDEO