Gopichand Padalkar : आधी राडा, आता बोलती बंद, आक्रमक पडळकरांनी 'त्या' एका प्रश्नाचं उत्तर टाळलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gopichand Padalkar : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आज विधिमंडळात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी
विधान भवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. आमदार आणि मंत्री ज्या प्रवेशद्वारातून विधान भवनात प्रवेश करतात त्याच द्वारासमोर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आज विधिमंडळात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज सकाळी विधिमंडळात आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, या प्रकरणी काल मी माझी भूमिका व्यक्त केली होती. मी कालच विधानसभा अध्यक्षांना भेटून दिलगिरी व्यक्त केली होती. त्याशिवाय, आमच्या कार्यकर्त्यांना ताकीद देऊन कारवाई करा असेही त्यांना सांगितले. रात्री उशिरा आमच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल केला आहे. आता आम्ही कोर्टाच्या कारवाईला सामोरे जाऊ असेही पडळकर यांनी म्हटले.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी राडा झाल्यानंतर एक व्हिडीओ दाखवला होता. या व्हिडीओत पडळकर हे कार्यकर्त्यांसोबत विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ चर्चा करत होते. त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीश देशमुख हे जाताना दिसले. त्याच वेळी पडळकर यांनी त्याच्याकडे पाहून पडळकर यांनी काही भाष्य केल्याचे दिसले. त्यानंतर देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला.
advertisement
या व्हिडीओबाबत विचारले असता, गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, तो नितीन देशमुख माझा कार्यकर्ता नाही. त्याला मी ओळखत नाही. तो व्हिडीओ सगळा पाहा, मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत होतो. लक्षवेधीवर चर्चा नव्हती म्हणून बाहेर आले होतो. त्याच वेळी ही घटना घडली असल्याचे पडळकर यांनी म्हटले.
पडळकरांचे त्या प्रश्नावर मौन...
पत्रकारांशी संवाद साधताना पडळकर यांनी राड्याबाबत प्रश्न विचारला. तुमचा काही संबंध नव्हता, पण तुम्ही काही कार्यकर्त्यांना थांबवण्यास का गेला नाहीत, यावर गोपीचंद पडळकर यांनी भाष्य करणे टाळलं. ऐरवी पत्रकारांच्या प्रश्नांवर आक्रमक भाषेचा वापर करत विरोधकांवर हल्लाबोल करणारे पडळकर यांनी थेट मौन बाळगल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
Gopichand Padalkar News LIVE | पत्रकारांच्या प्रश्नावर पडळकर गप्प काय घडलं? | Jitendra Awhad
advertisement
विधानभवनाबाहेर रात्रभर तुफान राडा, गाडीखाली झोपले आव्हाड
रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांच्या ज्या कार्यकर्त्याने मार खाल्ला त्याच नितीन देशमुखला अटक केली. पोलिसांच्या या कृतीनंतर पडळकर आव्हाड यांच्यातील वाद आणखी शिगेला पोहोचला. नितीन देशमुखांना ताब्यात घेतल्याचं समजताच जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह तातडीने विधानभवन परिसरात पोहोचले. त्यांनी नितीन देशमुखांच्या अटकेचा विरोध केला. देशमुखांना पोलीस घेऊन जात असताना आव्हाडांनी पोलिसांनी गाडीसमोर बसून ठिय्या दिला. एवढंच नव्हे तर हे आंदोलन शिगेला पोहोचल्यानंतर जितेंद्र आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली झोपले. यानंतर पोलिसांनी ताकदीचा वापर करत आव्हाडांना गाडी खालून ओढून बाहेर काढलं. त्यांना बाजुला करत नितीन देशमुखांना पोलीस घेऊन गेले.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gopichand Padalkar : आधी राडा, आता बोलती बंद, आक्रमक पडळकरांनी 'त्या' एका प्रश्नाचं उत्तर टाळलं