GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत जीबीएसचा शिरकाव, 'इतक्या' रुग्णांना झाली लागण

Last Updated:

पुण्यातील गुइलेन बॅरे सिड्रोम (जीबीएस) आजार सांगलीत शिरला आहे. सांगलीत तीन नवीन रुग्ण आढळले असून, एकूण सहा रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

guillain barre syndrome
guillain barre syndrome
GBS outbreak Sangli : पुण्यात गुइलेन बॅरे सिड्रोम (Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. त्यानंतर आता या आजाराने कोल्हापूरनंतर सांगलीत शिरकाव केला आहे. सांगलीत आज जीबीएसचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयातील रुग्णसंख्याही सहावर पोहोचली आहे. या रुग्णांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. यानंतर आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आष्टा (ता.वाळवा), विटा (खानापूर) व नेलकरंजी (आटपाडी) येथील रूग्ण आहेत. या रूग्णांवर सांगली शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सांगली शहरात रूग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवार अखेर 600 घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही केली. सांगली शहरातील चिंतामणीनगर मध्ये एका रूग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली आहे.
advertisement
सांगलीत आढळलेला रूग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाउन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. तसेच संशयित रूग्णावर योग्य उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहेत. त्याचसोबत पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले येत आहे. हातापायामध्ये गोळे मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. हा आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही,असेही आरोग्य विभागाने डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत जीबीएसचा शिरकाव, 'इतक्या' रुग्णांना झाली लागण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement