Maratha Reservation: मोठी बातमी! ओबीसी संघटनांना धक्का, हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

Last Updated:

Maratha Reservation High Court: हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी पार पडली.

ओबीसी संघटनांना धक्का, हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार
ओबीसी संघटनांना धक्का, हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार
मुंबई: हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पाडली. हायकोर्टाने ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणासाठी शासनाने काढलेल्या जीआरवर अंतरीम स्थगिती देण्यास नकार दिला.
मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या याचिकांना अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला असून, यामुळे राज्य सरकारला महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.
अध्यादेशाला विरोध करणाऱ्या दाखल याचिका या आताच योग्य आहे ? हा निष्कर्ष आताच काढणं अयोग्य असल्याचे खंडपीठाने म्हटले. जात प्रमाणपत्र जारी करताना अनेक पुराव्यांची तपासणी केली जाते. यानंतरही छाननी समितीचा निर्णय यात महत्वाचा असतो.  कायदा आधारावरच प्रक्रिया राज्य सरकारला फॉलो करावीच लागणार आहे.  2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला.
advertisement
मुंबई उच्च न्यायालयात कायदेपंडितांमधे युक्तिवाद करण्यात चढाओढ लागल्याचे दिसून आले. कायद्याच्या आधारावर जीआर काढल्याचा सरकारचा दावा घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. तर, कायद्याचं कोणतंही उल्लंघन केलं नसल्याचं,महाधिवक्ता डॉ बिरेंद्र सराफ यांनी आग्रही युक्तिवाद केला. या अध्यादेशाला तातडीनं स्थगित करा ही याचिकाकर्त्यांनी आक्रमक मागणी केली. पण, डॉ. बिरेंद्र सराफ यांनी कडाडून विरोध केला.
advertisement

राज्य सरकारला दिलासा...

राज्यात मराठा आरक्षणावरून गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वातावरण तापलेले असताना, मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे मराठा समाजासाठी सुरू असलेल्या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेवर कोणतीही तात्काळ अडचण निर्माण झाली नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सरकारला दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation: मोठी बातमी! ओबीसी संघटनांना धक्का, हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement