Hingoli : उन्हाचा कडाका असह्य, कूलर लावणं 14 वर्षांच्या मुलाच्या बेतलं जीवावर अन् गमावला जीव
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कुलरमध्ये पाणी घातल्यानंतर गणेशला वीजेचा जोरदार धक्का बसला. शॉक लागताच गणेश जमिनीवर कोसळला.
मनिष खरात, हिंगोली : उन्हाचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी फॅन, एसी, कूलर यांचा वापरही वाढला आहे. दरम्यान, कूलरमुळे एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. १४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यात सुकळी खुर्द इथं ही घटना घडली. मृत्यू झालेल्या १४ वर्षीय मुलाचं नाव गणेश खिल्लारी असं आहे. उन्हाळा सुरू असल्याने घरात कुलर, एसी अशा गोष्टींचा वापर केला जातो. घरात जास्त गरम होत असल्यानं गणेश कुलर लावण्यासाठी गेला आणि त्याने जीव गमावला.
कुलरमध्ये पाणी घातल्यानंतर गणेशला वीजेचा जोरदार धक्का बसला. शॉक लागताच गणेश जमिनीवर कोसळला. त्याचा आवाज ऐकून घरातील लोक तिथे आले. त्यांनी वीजपुरवठा बंद केला आणि गणेशला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुकळी गावात घडलेल्या घटनेनंतर आता हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
घरात कुलर किंवा वीजेवर चालणारी वस्तू वापरताना त्याबाबत योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. लहान मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवणं आणि त्यांना संभाव्य धोक्याची माहिती देणं गरजेचं आहे. वीजेवर चालणाऱ्या वस्तूंमध्ये बिघाड झाल्यात त्या वेळीच दुरुस्त करून घ्याव्यात. यामुळे अशा दुर्घटना घडणार नाहीत आणि अनर्थ टळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 27, 2024 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli : उन्हाचा कडाका असह्य, कूलर लावणं 14 वर्षांच्या मुलाच्या बेतलं जीवावर अन् गमावला जीव