दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी मी मरणार; वृद्धाची भविष्यवाणी खरी ठरली का? पाहण्यासाठी हिंगोलीत गाव लोटलं

Last Updated:

जगभरात असे अनेक लोक आहेत जे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. कोणीही बोंधू बाबा किंवा कोणी महाराजांनी सांगितलेल्या चुकीच्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतात.

वृद्धानं सांगितली स्वतःच्या मृत्यूची वेळ
वृद्धानं सांगितली स्वतःच्या मृत्यूची वेळ
मनीष खरात, हिंगोली : जगभरात असे अनेक लोक आहेत जे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. कोणीही बोंधू बाबा किंवा कोणी महाराजांनी सांगितलेल्या चुकीच्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतात. अशा अनेक घटना समोर येत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात अशा घटना घडत असतात. यामध्ये आणखी भर पडली असून हिंगोलीमध्ये असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला. एका व्यक्तीनं त्याच्या मृत्यूची वेळ सांगितली. त्यानंतर जे घडलं ते त्यानं आणखीनच खळबळ उडाली.
हिंगोलीत एका वृद्ध व्यक्तीने चक्क स्वतःच्या मृत्यूची वेळ सांगितली. हिंगोली तालुक्यातील लिंबी गावात हा अंधश्रद्धेची घटना पहायला मिळाली. धोंडबाराव देवकते असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.
मला आज दुपारी दोन वाजून 57 मिनिटांनी मरण येणार आहे, असं या व्यक्तीने घरच्या सर्वांना सांगितलं होतं. त्यामुळे नातेवाईकांची व गावकऱ्यांची गर्दी जमली. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले. घरात धार्मिक वातावरण असलेल्या हा व्यक्ती असून शिक्षितही आहे. धोंडबाराव देवकते यांचं वय साधारण पंच्याहत्तर वर्षे आहे.
advertisement
दरम्यान, व्यक्तीच्या या वाक्यानं संपूर्ण गावासह पोलीसही जमले मात्र तो वृद्ध व्यक्ती अजून जिवंत आहे. त्याला काहीही झालं नाही. या घटनेनं सध्या चांगलीच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा रंगली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी मी मरणार; वृद्धाची भविष्यवाणी खरी ठरली का? पाहण्यासाठी हिंगोलीत गाव लोटलं
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement