मराठवाड्यात पावसाचं रौद्ररुप, 6 दिवसांमध्ये किती जणांचा मृत्यू, अहवाल समोर

Last Updated:

विभागामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दि.२०.०९.२०२५ ते दि. २६.०९.२०२५ दरम्यान १२ व्यक्ती आणि ३५९ जनावरे मयत झाले असून १४१६ घराचे अंशतः नुकसान झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कधी नव्हे इतका पाऊस मराठवाड्यात पाहण्यास मिळाला. आणखी ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान,  दिनांक २०.०९.२०२५ पासून ते दि.२६.०९.२०२५ पर्यंत सरासरी ११९.९० मि.मी इतका पाऊस झाला तर तर २४४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. विभागामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दि.२०.०९.२०२५ ते दि. २६.०९.२०२५ दरम्यान १२ व्यक्ती आणि ३५९ जनावरे मयत झाले असून १४१६ घराचे अंशतः नुकसान झालं आहे. जिल्ह्यांकडून प्राप्त प्राथमिक अंदाजानुसार ५३६१८१.५९ हे.आर क्षेत्राचे नुकसान झाले आहे, असा अहवाल छत्रपती संभाजीनगर विभागाने दिला आहे.
विभागात मागील २४ तासात ४१.०० मि.मी पर्जन्यमान झालेले असून १४१ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासात ०४ व्यक्ती आणि ८० जनावरे मयत झाली असून २०५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. २७.०९.२०२५ रोजी दुपारी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेल्या पुढील पाच दिवसाच्या अंदाजानुसार दि.२७.०९.२०२५ रोजी विभागातील सर्व जिल्ह्यांना orange alert तर दि.२८.०९.२०२५ रोजी विभागातील छत्रपती संभाजीनगरला orange alert तर उर्वरित सात जिल्ह्यांना yellow alert देण्यात आला आहे. दि.२९.०९.२०२५ रोजी विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला yellow alert देण्यात आला आहे.
advertisement
विभागीय आयुक्तांचे सतर्क राहण्याचे आवाहन
सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील विसर्ग पुढील 3 ते 4 तासामध्ये 40 हजार क्युसेकहून 1 लाख क्युसेक पर्यंत वाढणार असल्याने सिंदफणा नदीला व नद्याच्या संगमाच्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने LOW LINE क्षेत्रामधील नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये. तसेच मराठवाड्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊस व पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी सुरक्षित रहावे.व संबंधित जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अफवावर विश्वास ठेवू नये. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे.आपत्तीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
advertisement
शोध आणि बचावकार्य
परभणी
1. मौ.चुडावा ता. पूर्णा येथे पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. नगरपालिका महसूल व पोलीस पथक पूर्णा तालुक्यातील सदर व्यक्तीला रेस्क्यू करण्यात आले.
2. मौ.शेख राजुर ता. पालम येथे पुराच्या पाण्यामध्ये दोन व्यक्ती अडकलेले होते. मौ.गुलखंड येथील दोन नागरिकांना असे एकूण ०४ नागरिकांना पुरातून स्थानिक शोध व बचाव पथकाच्या सहायाने सुखरूप रेस्क्यू करण्यात केले आहे. तर मौजे डाकू पिंपरी ता. पाथरी जि परभणी येथून एकूण 20 लोकांना बाभळगाव येथे जिल्हा परिषद येथे पुराच्या पाण्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळेत स्थलांतरित केले.
advertisement
लातूर
1. अहमदपूर तालुक्यातील मौ.चीलखा बॅरेजवर जलसंपदा विभागाचे 03 मजूर अडकले होते. अहमदपूर व पोलीस हेडक्वार्टर, लातूर येथील शोध-बचाव पथकाच्या मदतीने सर्व मजूर सुखरूप रेस्क्यू करण्यात आले.
2. तालुक्यातील मौजे निवडी ०१ व्यक्ती शेतात काम करून घराकडे येत असताना पुराच्या पाण्यात अडकला होता. स्थानिक होमगार्ड, आपदा मित्र व पोलीस यांच्या मदतीने त्या व्यक्तीचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
advertisement
3. उदगीर तालुक्यातील मौजे हाळी हंडरगुळी येथील ०१ महिला पुराच्या पाण्यात अडकली होती. उदगीर शोध व बचाव पथकाकडून सुटका करण्यात आली आहे.
सद्यस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यात NDRF व स्थानिक शोध व बचाव पथक कार्यरत आहेत.
चाकूर तालुका - स्थलांतरण व निवारा व्यवस्था
चाकूर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. असून 20 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करून राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
जिल्हा बीड
मौजे नित्रुड तालुका माजलगाव येथे पूरामध्ये एकुण 07 नागरिक अडकले होते. त्यांना NDRF पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सद्यस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात ARMY,NDRF व स्थानिक शोध व बचाव पथक कार्यरत आहेत.
जिल्हा नांदेड
दि. 27 सप्टेंबर रोजी जवळपास 28 जणांचे शोध व बचाव कार्य करण्यात आले आहे.
advertisement
नांदेड शहरातील श्रावस्ती नगर 15 व समीराबाग 06 येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण 21 नागरिकांना अग्निशमन विभाग पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले.
नांदेड तालुक्यातील बोंडार तर्फे नेरली गावांमधील हळदेकर फार्म हाऊस येथे दोन महिला दोन पुरुष व एक छोटे मुल आसना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. स्थानिक तलाठी यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले आहे.
लोहा तालुक्यातील भेंडेगांव येथील एका व्यक्तीचा बचाव तहसिलदार लोहा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक शोध व बचाव पथकाने केला आहे.
सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात SDRF व स्थानिक शोध व बचाव पथक कार्यरत आहेत.
धाराशिव
सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ३६१५ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. ता.धाराशिव मधील ६०,ता.भूम ६०,ता.परंडा मधील २० गावातील ३४६० नागरिकांना तर ता.कळंब मधील ३५ असे एकूण ३६१५ नागरिकांना सुक्षेचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.सद्यस्थितीत जिल्ह्यात ndrf व स्थानिक शोध व बचाव पथक कार्यरत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठवाड्यात पावसाचं रौद्ररुप, 6 दिवसांमध्ये किती जणांचा मृत्यू, अहवाल समोर
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement