advertisement

'2 मिनिटं बाहेर ये ना'; हात, पोट आणि पायांवर चाकूने सपासप वार, भररस्त्यात बायकोवर 13 वार; जळगाव हादरलं

Last Updated:

Jalgaon Murder: डोळ्यात मिरची पूड फेकली आणि तिला काही समजण्याच्या आत दीपकने जवळ असलेला चाकू काढून तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिघी
जळगाव : 'संशय' हा सुखी संसाराला लागलेली अशी वाळवी आहे, ज्यामुळेृ होत्याचे नव्हते होते. अशीच एक थरारक आणि सुन्न करणारी घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका नराधम पतीने आपल्या पत्नीवर भररस्त्यात चाकूने तब्बल 13 वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
धरणगावमधील संजय नगर परिसरात ही घटना घडली. सोनल लोंढे ही विवाहिता आपल्या कामावर होती त्यावेळी तिचा पती दीपक लोंढे याने तिला बोलण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. सोनल बाहेर येताच पूर्वनियोजित कट रचलेल्या दीपकने क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने प्रथम सोनलच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि तिला काही समजण्याच्या आत दीपकने जवळ असलेला चाकू काढून तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
advertisement

सोनलवर तब्बल  13 वार

आरोपीने रागाच्या भरात सोनलच्या हात, पाय, पोट आणि पाठीवर एकामागून एक 13 वार केले. भररस्त्यात सुरू असलेल्या या रक्तरंजित खेळामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमांमुळे आणि अतिरक्तस्त्रावामुळे सोनल जागीच कोसळली. तिला तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
advertisement

आरोपी पतीला ठोकल्या बेड्या 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक आणि सोनल यांच्यात गेल्या काही काळापासून चारित्र्याच्या संशयावरून खटके उडत होते. आरोपी पती सातत्याने तिच्यावर संशय घेत असल्याने घरात वादाचे वातावरण होते. याच वादाचा शेवट अशा भयानक कृत्यात होईल, अशी कल्पना कोणालाही नव्हती. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी तातडीने आरोपी पती दीपक लोंढे याला बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भरदिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने धरणगाव शहरात भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'2 मिनिटं बाहेर ये ना'; हात, पोट आणि पायांवर चाकूने सपासप वार, भररस्त्यात बायकोवर 13 वार; जळगाव हादरलं
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement