advertisement

CNG की हायब्रिड? यापैकी कोणत्या कारमध्ये पैशांची जास्त बचत होते? हिशोब पाहाच

Last Updated:

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमीमुळे लोकं आता इलेक्ट्रिक कार किंवा सीएनजी पर्यायाकडे वळत आहेत. दरम्यान आज आपण हायब्रिड कार की सीएनजी कार, दोन्हीपैकी कोणती जास्त परवडणारी आहे. याविषयी जाणून घेणार आहोत.

सीएनजी vs हायब्रिड कार
सीएनजी vs हायब्रिड कार
मुंबई : देशातील महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही जास्त आहेत. या किंमतींमध्ये थोडीही वाढ झाली की, सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडतो. अशावेळी लोक वाहन खरेदी करताना शंभरवेळा विचार करतात. आता पेट्रोलचा खर्च टाळता यावा म्हणून बाजारात सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनही आली आहेत. पण या दोन्हीपैकी कोणती जास्त परवडणारी आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? तर याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया.
सीएनजी कार लोकांची पहिली पसंत 
सीएनजी कार या कमी खर्चात जास्त चालतात. ज्यामुळे त्या लोकांना खुप आवडतात. विशेषतः शहरात रोज लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी हा चांगला ऑप्शन आहे. या कारची रनिंग कॉस्ट खुप कमी असते आणि किंमतही जास्त वाढत नाही. खरंत सीएनजी टँकमुळे बूट स्पेस थोडा कमी होतो. अनेकदा लांब रांगेत गॅस भरायला उभं राहावं लागतं. पण कंपन्या आता या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
हायब्रिड कारमध्ये वेगळं काय?
हायब्रिड कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीचं मिश्रित रुप असतात. यात इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीही असते. ज्या काला जास्त एफिशिएंट बनवतात. या कारची खास गोष्ट म्हणजे, ही वेगळी चार्ज करण्याची गरज पडत नाही. कारण ब्रेकिंग आणि इंजननेच बॅटरी चार्ज होते. ड्रायव्हिंगही स्मूद मिळते. पण किंमत पेट्रोल मॉडलपेक्षा 3-4 लाख रुपयांनी जास्त असते.
advertisement
खर्चातील खरा फरक 
खर्चाविषयी बोलायचं झाल्यास, सीएनजी आणि हायब्रिड दोन्हीही पेट्रोलपेक्षा स्वस्त आहेत. उदाहरण पाहायचं झाल्यास Maruti Grand Vitara पाहूया. याचं सीएनजी व्हेरिएंटचं मायलेज जवळपास 26.6 km/kg रुपये आहे. जर सीएनजीची किंमत 80 लाख रुपये मानली गेली तर 1500 किमी चालवण्यात जवळपास  4,500 रुपयांचा खर्च येतो. म्हणजेच प्रति किमी खर्च जवळपास 3 रुपये असतो.
advertisement
हायब्रिड कारला खर्च किती येतो 
आता आपण या कारच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटविषयी बोलूया. तर या कारचं मायलेज जवळपास 27.97 km/l आहे. पेट्रोल 100 रुपये लिटर असेल. तर 1500 किमी चालवण्यात जवळपास 5,300 ते 5,500 रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच प्रति किमी खर्च जवळपास 3.5 रुपये असतो. ही सीएनजीपेक्षा थोडी महाग आहे, पण पेट्रोल कारपेक्षा थोडी स्वस्तही आहे.
advertisement
कोणती कार खरेदी करणं बेस्ट? 
तुम्ही रोजच दूरचं अंतर पारकरत असाल आणि फक्त खर्च वाचवायचा असेल. सीएनजी कार तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. तसंच तुम्हाला स्मूद ड्रायव्हिंग, भारी टेक्नॉलॉजी आणि थोडा प्रीमियम अनुभव हवा असेल तर तुम्ही हायब्रिड कार निवडू शकता. अखेर निर्णय हा तुमची गरज आणि बजेटवर अवलंबून आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
CNG की हायब्रिड? यापैकी कोणत्या कारमध्ये पैशांची जास्त बचत होते? हिशोब पाहाच
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement