फुल उत्पादक शेतकरी कंपन्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय..
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
फुल उत्पादक शेतकरी कंपनी यांच्यासाठी संस्था परिसरात किंवा थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत, यामुळे फुल निर्यातीस चालना मिळेल, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत दिले.
फुल उत्पादक शेतकरी कंपनी यांच्यासाठी संस्था परिसरात किंवा थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत, यामुळे फुल निर्यातीस चालना मिळेल, असे निर्देश पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत दिले.
यावेळी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर व्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
रावल म्हणाले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येईल, यामुळे संस्थेच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळेल. नेदरलँड, इस्रायल, जपान व तांजानिया येथील विद्यापीठांचे सहकार्य घेत फुल उत्पादक शेतकऱ्यांकरिता आंतरराष्ट्रीय पातळीववरील प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत.
advertisement
आफ्रिका खंडाअंतर्गत येणाऱ्या देशामधील कृषी विभागाशी संपर्क साधून तेथील शेतकऱ्यांना या संस्थेमध्ये किंवा त्या देशामध्ये जाऊन प्रशिक्षण द्यावे. इतर राज्यांच्या कृषी, फलोत्पादन विभागांशी संपर्क साधून त्या राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना संस्थेत प्रशिक्षण द्यावे.
राज्यातील साखर कारखान्यांना संस्थेचे सभासद करुन त्यांच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण राबवावे. संस्थेच्यावतीने कृषी पर्यटन व नॅचरोपॅथीसारखे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत. बांबू मूल्यवर्धन केंद्राच्या बांबू सायकलचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याबाबत श्री. रावल यांनी मार्गदर्शन केले.
advertisement
मंत्री रावल यांनी संगणकीकृत वर्गखोल्या (डिजिटल क्लासरूम), उपहारगृह इमारत, शीतगृह विस्तारित इमारतीची पाहणी केली. निवासी सुविधा, एम.बी.ए. महाविद्यालय, पी.टी.सी. प्रयोगशाळा, माती व पाणी तपासणी प्रयोगशाळा यांची माहिती देण्यात आली. आकरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली तसेच मार्च २०२६ पर्यंतचा प्रशिक्षण आराखडा सादर केला.
Location :
Maharashtra
First Published :
September 20, 2025 11:06 PM IST