BREAKING: पाकिस्तानची शेपूट वाकडीच! LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबाराची माहिती समोर

Last Updated:

भारत आणि पाकिस्तान  LoC अर्थात सीमारेषेवर तणाव पुन्हा वाढला आहे. लीपा व्हॅली सेक्टरमध्ये सीजफायरचे उल्लंघन झाल्याची माहिती मिळतेय.

News18
News18
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
दिल्ली:  पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानने माघार घेतली आणि शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. पण, पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे. पाकिस्तानने पुन्हा सीमारेषेवर कुरापत्या सुरू केल्या आहे. सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. लीपा व्हॅली सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
भारत आणि पाकिस्तान  LoC अर्थात सीमारेषेवर तणाव पुन्हा वाढला आहे. लीपा व्हॅली सेक्टरमध्ये सीजफायरचे उल्लंघन झाल्याची माहिती मिळतेय. दोन्ही बाजूंनी काही मिनिटे जोरदार गोळीबार सुरू होता आणि मिनी-आर्टिलरीचाही वापर झाल्याचं सैनिकी सूत्रांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबारात जीवतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण ,पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं उघड झालं आहे.
advertisement
मे महिन्यातही झाला प्रयत्न 
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची ही पहिली वेळ नाही. ४ मे २०२५ रोजी ही गोळीबाराची घटना घडली होती. मुळात लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला लीपा व्हॅली आहे. या ठिकाणी साधारण 4-5 दहशतवाद्यांचे वेगवेगळे गटाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.  या भागात सामन्य नागरिकांना इतत्र हलवण्यात आलं आहे. या भागात पाकिस्तानी सैन्य असतं आणि दहशतवादी संघटनेची लोक घुसखोरी करत असतात. त्यामुळे या भागात पोस्ट टू पोस्टवर फायरिंग केली जात असते. याच दरम्यान पाकिस्तानने कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये 5 वेळा फायरिंग केली होती.
advertisement
लीपा व्हॅलीचं का? 
नौगाम गावापासून थोड्याच अंतरावर पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील लीपा व्हॅली आहे, जिथं अनेक दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड असल्याची माहिती यायाआधी ही समोर आली होती. लीपा व्हॅली हा लश्करचा प्रमुख बालेकिल्ला आहे, जिथे हाफिज सईद देखील येऊन गेला होता. याच ठिकाणाहून मे महिन्यात वारंवार गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या होत्या.  पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील लीपा व्हॅलीमध्ये हटिया, गबडौरी, मंडाकुली यांसारख्या भागांमध्ये दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड असल्याचंही समोर आलंय.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
BREAKING: पाकिस्तानची शेपूट वाकडीच! LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबाराची माहिती समोर
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement